Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सामान्य माणसात राहणारा साधा आमदार; चौथ्या विजयासाठी सदा सरवणकर सज्ज

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत शिवसेनेची स्थापना केली. मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून शिवसेनेची अल्पावधीत ओळख निर्माण झाली आणि ओठावर नुकतीच मिसरूड उगवलेले हजारो तरुण या संघटनेत दाखल झाले. असंख्य आंदोलनांनी या शिवसैनिकांनी मुंबई दणाणून सोडली. मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि मराठी माणसाच्या प्रश्नासाठी तसेच मराठी माणसांना नोकऱ्या संधी मिळवून देण्यासाठी प्रचंड राडे केले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार, कोपऱ्या कोपऱ्यावर उभ्या राहिलेल्या शाखांचे संघटन आणि समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असणाऱ्या त्या तरुणांनी सामान्य मुंबईकरांचे असंख्य प्रश्न सोडवले. अत्यंत सामान्य कुटुंबातून आणि सामान्य आर्थिक परिस्थितीतून आलेल्या कित्येक तरुणांना बाळासाहेबांनी लोकप्रतिनिधी होण्याची संधी दिली आणि रस्त्याप्रमाणेच सभागृहात देखील या तरुणांनी स्वतःचा ठसा उमटवला. यातीलच एक नाव म्हणजे माहीमचे आमदार आणि सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर.

Sada Saravankar

शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे समस्त शिवसैनिकांसाठी विचारांचे सोने लुटण्याचा दिवस. दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळावा घेण्याची परंपरा सुरू केली. दादर माहीम माटुंगा या मराठी बहुल भागात मध्यमवर्गीय मराठी लोकांनी शिवसेनेला आपले मानले. याच भागातून अनेक नामांकित शिवसैनिकांनी शिवसेनेची धुरा समर्थपणे वाहिली. सदा सरवणकर हे त्यापैकीच एक.

नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी

अगदी तरुण वयापासून ते शिवसेनेच्या विचारांनी आणि बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झाले होते. मुंबईतल्या असंख्य तरुणांप्रमाणे सामान्य शिवसैनिक म्हणून त्यांनी संघटनेत कामाला सुरुवात केली. सामाजिक कामे करता करता दादर, माहीम परिसरात त्यांचा लोकसंपर्क प्रचंड वाढला आणि 1992 साली ते पहिल्यांदा बृहन्मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. 1997 साली त्यांना पुन्हा बृहन्मुंबई महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांची लोकप्रियता पुढेही कायम राहिली आणि 2002 साली ते पुन्हा महापालिकेवर निवडून गेले. 2002 ते 2004 या काळात ते बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. ही समिती मुंबई महानगरपालिकेच्या वर्तुळात अत्यंत महत्त्वाची समिती मानली जाते.

कॉंग्रेसमधून पराभूत

महानगरपालिकेत कारकीर्द गाजवल्यानंतर 2004 साली त्यांना विधानसभेचे तिकीट देण्यात आले आणि पहिल्याच प्रयत्नात ते विधानसभेवर निवडून सुद्धा गेले. शिवसेनेचे तत्कालीन नेते नारायण राणे यांच्याशी त्यांची विशेष सलगी होती. 2009 साली शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सदा सरवणकर यांना तिकीट नाकारले आणि शिवसेनेकडून आदेश बांदेकर यांना उमेदवारी देण्यात आली. या निर्णयामुळे चिडलेल्या सदा सरवणकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसमधून माहीम मतदारसंघातून 2009 ची विधानसभा निवडणूक लढवली. मात्र मत विभाजनाचा फटका बसल्यामुळे सरवणकर यांना पराभव पत्करावा लागला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नितीन सरदेसाई या मतदारसंघातून निवडून गेले.

शिवसेनेत पुनःप्रवेश

2014 साली सदा सरवणकर शिवसेनेत परतले आणि त्यांना माहीम मतदारसंघातूनच शिवसेनेने संधी दिली आणि ते निवडून देखील आले. 2019 साली त्यांनी विजयाची पुनरावृत्ती केली आणि ते तिसऱ्या वेळी आमदार म्हणून निवडून गेले. आपले आमदारकीच्या तीन टर्म मध्ये त्यांनी माहीम मतदारसंघातील स्थानिकांचे अनेक प्रश्न सोडवले. विविध प्रश्न सभागृहात मांडले. स्थानिकांच्या हक्कासाठी लढा दिला.

एकनाथ शिंदे यांना पाठींबा

2022 साली शिवसेनेत सत्तांतर झाले आणि चाळीस आमदार तसेच आठ मंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना बाजूला सारून एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेची धुरा दिली. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देखील झाले. आधी काही दिवस उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले सदा सरवणकर यांनी नंतर एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. एकनाथ शिंदे यांनीच सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी सदा सरवणकर यांची नियुक्ती केली. मुंबईच्या समाजकारणात सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष पद महत्त्वाचे मानले जाते. हे पद मिळताच सदा सरवणकर यांनी विविध कामांना गती दिली. सिद्धिविनायक मंदिर परिसरात सौंदर्यकरण आणि अन्य विकास कामांना त्यांनी चालना दिली. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला. सिद्धिविनायक मंदिर परिसराच्या सौंदर्यकरणाच्या कामासाठी 500 कोटी रुपयांचा निधी सरवणकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला. या निधीमधून भाविकांसाठी निवास व्यवस्था, वाहन तळ, दर्शन व्यवस्था भाविकांसाठी रांग आणि अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

किनारी भागात काम

माहीम विधानसभा मतदारसंघात किनारी भागाचा अंतर्भाव होतो. येथील कोळीवाड्यामध्ये अनियमित पाणीपुरवठ्याची स्थानिकांची तक्रार होती. सदा सरवणकर यांनी ही समस्या निर्मूलन करण्याचा प्रयत्न केला आणि येथील नागरिकांसाठी पंप उपलब्ध करून दिला.

लाडकी बहिणसाठी 12 हजार महिलांची नोंदणी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना शिंदे यांनी सुरू केलेली अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि महिलांना थेट लाभ देणारी योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दीड हजार रुपये दरमहा त्यांच्या खात्यात जमा करण्यात येतात. सरवणकर यांनी ही योजना माहीम मतदारसंघात काटेकोरपणे राबवली आणि तब्बल 12000 महिलांची या योजनेसाठी नोंदणी करून घेतली.

"सामान्य माणसात राहणारा साधा आमदार" अशी सदा सरवणकर यांची माहीम आणि दादर परिसरात ख्याती आहे. सर्वपक्षीयांशी आणि सर्व भाषिकांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर यांना पुन्हा माहीम मतदारसंघातून संधी दिली आहे. उद्धव ठाकरे गटाचे महेश सावंत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्याशी यावेळी सरवणकर यांचा सामना होत आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या लढतीकडे वेधले गेले आहे. लोकसंपर्क आणि आतापर्यंत केलेल्या कामांच्या जोरावर सदा सरवणकर ही लढत नक्की जिंकतील असा विश्वास त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+