जुलै महिन्याची सुरुवात आनंदाच्या बातमीने, गॅस सिलिंडरच्या दरात कपात
मुंबई: जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलिंडरच्या वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. तेल कंपन्यांनी एलपीजीच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. सिलिंडरचे दर 30 रुपयांनी कमी झाले आहेत.
तेल कंपन्यांनी जुलैच्या सुरुवातीला 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 30 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतींबद्दल बोलायचे झाले तर दिल्लीत 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 803 रुपये आहे. मुंबईत त्याची किंमत 802.50 रुपये आहे, जी कोलकाता, चेन्नई, दिल्लीपेक्षा स्वस्त आहे.
कोलकातामध्ये 14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 829 रुपये आहे. तर चेन्नईमध्ये 818.50 रुपये आहे.
19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरबद्दल बोलायचे झाले तर दिल्लीत त्याची किंमत 1 जुलैपासून 1646 रुपये असेल, जी आधी 1676 रुपये होती. मुंबईत 1598 रुपये, कोलकात्यात 1756 रुपये आणि चेन्नईमध्ये 1809.50 रुपये किंमत झाली आहे.
जाणून घ्या तुमच्या शहरात एलपीजी सिलिंडर किती स्वस्त?
राजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर 30 रुपयांनी स्वस्त झाला असून 1646 रुपयांचा झाला आहे. जूनमध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1676 रुपये प्रति सिलिंडर होती.
कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडर 31 रुपयांनी स्वस्त झाला असून सिलिंडर आता 1756 रुपयांना मिळेल. जूनमध्ये त्याची किंमत प्रति सिलिंडर 1787 रुपये होती.
मुंबईत व्यावसायिक सिलिंडर 31 रुपयांनी स्वस्त झाला असून आता सिलिंडरसाठी 1598 रुपये मोजावे लागतील. जूनमध्ये त्याची किंमत प्रति सिलिंडर 1629 रुपये होती.
चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलिंडर 30 रुपयांनी स्वस्त झाला असून त्याचे दर आता 1809.50 रुपये झाले आहे. जूनमध्ये त्याची किंमत 1840.50 रुपये प्रति सिलिंडर होती.
घरगुती सिलिंडरचे दर जैसे थे
दरम्यान, ही कपात व्यावसायिक सिलिंडरच्या कपात झाली असून घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती सिलिंडरचे दर जैसे थे आहेत. घरगुती 14.2 किलो एलपीजी सिलिंडरच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही आणि ते त्यांच्या पूर्वीच्या किमतींवर स्थिर आहेत. जाणून घ्या त्यांचे दर काय आहेत.
दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरचा दर 803 रुपये एवढा आहे.
कोलकाता येथे घरगुती एलपीजी सिलिंडर 803 रुपयांना उपलब्ध आहे.
मुंबईत घरगुती एलपीजी सिलिंडर 802.50 रुपयांना उपलब्ध आहे.
चेन्नईमध्ये घरगुती एलपीजी सिलिंडर 818.50 रुपयांना उपलब्ध आहे.












Click it and Unblock the Notifications