Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

एकनाथ शिंदेची खिल्ली उडवणाऱ्या कुणाल कामराला जेल की, बेल? मुंबई हायकोर्टाची 'ही' आली मोठी अपडेट

Comedian Kunal Kamra gets relief : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवणारा स्टँड अप काॅमेडियन कुणाल कामरा याच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहचले. त्याला अटक होणार की नाही याबाबत चर्चाही होत्या. आज 16 एप्रिल 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाकडून एक मोठी अपडेट आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कुणाल कामराला अटकेपासून दिलासा दिला आहे. यासह त्याला सुरक्षेची काळजी घ्यावी अशा सूचनाही उच्च न्यायालयाने दिल्या आहेत.

Comedian Kunal Kamra gets relief from arrest

कुणाल कामराने त्याच्या स्टँड-अप शोमध्ये एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता 'गद्दार' हा शब्द वापरला. त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावरही शेअर केला, त्यानंतर राजकीय वाद सुरू झाला आणि शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी कामरा यांच्याविरुद्ध मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली. नंतर कुणाल कामरावर गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर खार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तत्पुर्वी कामराचा व्हिडिओ जारी होताच त्याच्या मुंबईतील स्टुडिओची तोडफोड करण्यात आली होती.

मुंबई पोलिसांना कोर्टाने फटकारले

उच्च न्यायालयाने कुणाल कामराला त्याच्यावर दाखल गुन्ह्यात अटकेतून दिलासा दिला आहे. या प्रकरणात न्यायालयाने मुंबई पोलिसांनाही फटकारले असून, कुणालला त्याचे म्हणणे नोंदवण्यासाठी मुंबईला बोलावण्याची गरज होती का, तुम्ही त्यांच्या सुरक्षिततेची हमी देऊ शकता का? सरकारी वकिलांनी कुणाल कामराच्या जीवाला धोका नाही याची खात्री करावी, असेही न्यायालयाने निर्देश दिले.

काय आहे न्यायालयाचा आदेश आणि सूचना

कुणाल कामराला जबाब नोंदवण्यासाठी मुंबईला बोलवण्याची गरज नाही, असे हायकोर्टाने स्पष्ट केले. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती एसएम मोडक यांच्या खंडपीठाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतला. त्यानंतर हा आदेश दिला. कुणाल कामराचा जबाब नोंदवण्यात यावा, ही पोलिसांची मागणी न्यायालयाने मान्य केली. पण खार पोलिसांनी चेन्नईला जाऊन जबाब नोंदवायचा की अन्य काही पद्धतीचा अवलंब करायचा, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी कॉल करणे आवश्यक नाही हेही न्यायालयाकडून सांगण्यात आल्याचे
न्यूज 18 च्या वृ्त्तात म्हटले आहे.

काय होता कुणाल कामराचा दुसरा व्हिडिओ?

कुणाल कामराने त्याच्या शोचा पहिला व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर त्याच्यावर शिवसेनेकडून टीका झाली आणि शिवसैनिकांच्या संतप्त भावना समोर आल्या, यानंतर त्याच्या स्टुडिओची तोडफोड झाली. हाच मुद्दा घेऊन त्याने "हम होंगे कामयाब" ऐवजी "हम होंगे कंगाल" हे गाणे वापरुन एक व्यंग्यात्मक गाणे गायले. या व्हिडिओमध्ये खार येथील हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तोडफोडीच्या घटना देखील दाखवल्या आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+