Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मुख्यमंत्री शिंदे यांनी मध्यरात्री गुवाहाटीला जाऊन घेतलं कामख्या देवीचं दर्शन

मुंबई : विधानसभा निवडणूकीचे बिगूल वाजले आहेत. महायुतीचे जागा वाटप आता जवळपास पूर्ण झालं आहे. शिवसेनेकडून विधानसभा निवडणूकीची 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल रात्री गुवाहाटीत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी कामख्या देवीचं दर्शन घेतलं आहे

गुवाहाटीत पोहचल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधीशी संवाद साधला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आमची पहिली यादी जाहीर झाली आहे. लवकरच दुसरी यादी ही जाहीर होईल. आम्ही निवडणूक लढवू आणि महायुती जिंकेल ही,असा विश्वास ही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

Cm Eknath Shinde

भाजपाकडून विधानसभा निवडणूकीची आपल्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यानंतर काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या वतीने 45 उमेदवारांची पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. बहुतांश विद्यमान आमदारांचा यात समावेश आहे.

मुख्यमंत्री शिंदे कोपरी-पाचपाखाडीतून निवडणकीच्या आखाड्यात

महायुतीमधील घटक पक्ष शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी काल रात्री जाहीर करण्यात आली आहे.शिवसेनेच्या पहिल्या यादीत 45 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः कोपरी पाचपाखाडी येथून विधानसभा निवडणूक लढणार आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+