जळगाव सोन्यासाठी फेमस, येथील भगिनीही सोन्यापेक्षाही अनमोल! एकनाथ शिंदे काय म्हणाले? वाचा ठळक मुद्दे
CM eknath shinde on Lakhpati Didi Yojana : जळगाव जिल्हा सोन्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील भगिनीही सोन्यापेक्षाही अनमोल आहेत असं वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. ते आज जळगाव इथं लखपती दिदी योजनेच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदेंच्या भाषणातील ठळक मुद्दे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लखपती दीदी संमेलन सोहळा प्रसंगी भाषण केले यात त्यांनी काही महत्वाच्या मुद्द्यांवर भर देत मार्गदर्शन केलं.
- लखपती दीदी संमेलनासाठी माता भगिनीचा महासागर जमला आहे.
- सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे राज्यात आणि जळगाव जिल्ह्यात स्वागत.
- अकरा लाख लखपती दिदींचे अभिनंदन. राज्य शासनाला या भगिनी भरभरून आशीर्वाद देतील.
- अन्नपूर्णा योजने अंतर्गत तीन गॅस सिलिंडर देत आहोत. उच्च शिक्षण मोफत. प्रवासात सवलत. महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचे काम करत आहोत.
- महिलांना ३३ टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला.
- मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानातून प्रधानमंत्री महोदयांच्या स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न.
- ३ कोटी लखपती दीदी बनवण्याच्या प्रक्रियेत महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल. २५ हजार ३० कोटींची कर्जे स्वयं सहायता गटांना देण्यात आली आहे. त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात आहे.
- देशाला महाशक्ती बनवण्यासाठी महिलांची भागीदारी आवश्यक आहे. ७६ हजार कोटींच्या वाढवण बंदर विकासाला सहाय्य केले. मेट्रो प्रकल्पाला मदत केली.
- कांदा, कापूस, दूध, सोयाबीन यांना चांगला दर मिळण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री महोदयांनी लक्ष घालावे. याशिवाय, सिंचन प्रकल्पांना मदत करावी.
- नेपाN येथे झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीय प्रती पाच लाख रुपयांची मदत केली जाणार आहे.












Click it and Unblock the Notifications