CM Eknath Shinde on Govindas Health :गोविंदांबद्दल CM शिंदेंचं मोठं वक्तव्य, प्रकृतीची केली विचारपूस
CM Eknath Shinde on Govindas Health : अभिनेते गोविंदा यांच्या प्रकृतीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी संपर्क साधून विचारपूस केली तसंच त्यांना लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या. त्यानंतर त्यांनी गोविंदांबद्दल एक मोठ विधान केलं आहे. गोविंदांच्या काठीण काळात त्यांना सर्व आवश्यक ती मदत मिळेल याची खात्री दिली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
सिनेजगताचा सुपरस्टार आणि रसिकांच्या गळ्यातील ताईत असलेला गोविंदाला आज सकाळी अपघाती गोळी लागली. स्वतःच्याच हाताने ही गोळी लागली. या दुर्दैवी घटनेतून तो बालंबाल बचावला आहे. डाॅक्टरांनी त्याच्या पायात लागलेली गोळी काढली असून त्याने आपला ऑडिओ संदेश चाहत्यापर्यंत पोहचवला आहे. आपण सुखरुप असल्याचं त्यानं म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले सीएम शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "मी गोविंदा यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली. लवकर आणि पूर्ण बरे होण्यासाठी आणि स्वास्थ्यपूर्ण जीवनासाठी राज्य सरकार आणि जनतेच्या वतीने सदिच्छा व्यक्त केल्या. गोविंदा आणि त्यांच्या कुटुंबीयांना या कठीण काळात सर्व आवश्यक मदत मिळेल याची खात्री दिली आहे. आमच्या सदिच्छा आणि प्रार्थना त्यांच्यासोबत आणि त्यांच्या प्रियजनांसोबत आहेत.
गोविंदा लवकर बरे व्हावे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, गोविंदा हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी त्यांच्या अभिनयातून लाखो लोकांना आनंद दिला आहे. त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त करत आहोत."
गोविंदाचा ऑडिओ मेसेज
रुग्णालयातून सुपरस्टार गोविंदाने आपला ऑडिओ मेसेज जारी केला. त्यात तो म्हणाला, "आपल्या सर्वांचा आशीर्वाद आणि आई-वडीलांचा आशिर्वादामुळे गुरुच्या कृपेमुळे मला जी गोळी लागली , त्यातून मी बचावलो आहे. ती काढण्यात आली आहे. मी येथील डाॅक्टरांना धन्यवाद देतो. आपल्या सर्वांनी माझ्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल धन्यवाद मानतो. "












Click it and Unblock the Notifications