बहिणींच्या हिताच्या आड याल तर गाठ माझ्याशी, मुख्यमत्र्यांचा विरोधकांना इशारा
पुणे : लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी आधी अर्ज केले त्यांच्या खात्यावर रक्षबंधनाधीच 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे मात्र ऑगस्ट महिन्यात अर्ज भरले त्यांच्या अर्जांना अजून मंजूरीचा संदेश मिळालेल्या त्यामुळे त्या महिलांना संभ्रमात आहेत मात्र या महिलासांठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. या महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे मिळणार आहेत. तसेच बहिणींच्या हिताच्या आड कोणी आला तर गाठ माझ्याशी आहे असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांनाही फटकारले आहे.
महायुती सरकारच्या वतीने शनिवारी पुण्यातील बालेवाडीत 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम' आयोजित केला गेला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे यावेळी उपस्थित होते, त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार पडणार असं वारंवार सांगत आहेत. पण बहीण आणि ज्येष्ठांच्या आशीर्वादाने सरकार टिकलं नाही, अधिक मजबूत झालं. बहिणीच्या हिताच्या आड कोणी आला तर गाठ माझ्याशी आहे. व्यासपीठावर बसलेल्या भावांशी आहे. बाकी कशाचा नाद करा. पण या विषयात नाद करायचा नाही. आम्ही भाऊ म्हणून समर्थ आहोत.
तीन महिन्यांचे पैसे एकदम मिळणार?
ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्यांच्याबाबत मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली. ज्यांच्या खात्यात पैसे गेले नसतील त्यांच्या खात्यात पैसे जातील. ज्यांचं आधार लिंक राहिलं असेल त्यांनाही पैसे मिळेल. 31 ऑगस्ट पर्यंत मुदत आहे. ऑगस्टमध्ये अर्ज भरल्यावर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे मिळतील. लाडक्या बहिणींना दर महिन्याला दीड हजाराचा माहेरचा आहेर मिळणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
खोडा घालणा-या सावत्र भावांना जोडा दाखवा
पुण्यातील बहिण माझी लाडकी योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले की, 1500 रुपयांत काय होणार असे विरोधक म्हणत आहेत, पण तुमच्या सारखे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन माझ्या भगिनी आणि भाऊ जन्माला आलेले नाहीत. महिलांना आता माहेरला जाताना कोणा समोर हात पसरावे लागणार नाहीत. बहिणींच्या आशीवार्दाने सरकार केवळ टिकलेच नाही तर अधिक मजबूत झाले आहे. त्यामुळे जे खोडा घालायला आले तर त्या सावत्र भावांना जोडा दाखवा असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.












Click it and Unblock the Notifications