Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

...त्या अपघातातील जखमींची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट,मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची आर्थिक मदत

मुंबई - मुंबई पुणे महामार्गावर पनवेल जवळ वारकऱ्यांच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. त्यामध्ये पाच वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर अनेक वारकरी जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या वारकऱ्यांची मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे.

आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रभरातून लाखो भाविक पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असतात. 17 जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त डोंबिवली मधून देखील एका खाजगी बस मधून 54 वारकरी पंढरपूर कडे निघाले होते. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर पनवेल जवळ ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने मध्यरात्री बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला.

CM Eknath Shinde visited Vitthal devotees injured

या अपघातामध्ये बस वीस फूट खोल दरीमध्ये जाऊन कोसळली.माहिती करताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आणि क्रेनच्या सहाय्याने बस वर काढून बसमधील जखमी नागरिकांना तातडीने कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात व ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

बस अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू..

मुंबई-पुणे महामार्गावर कळंबोली पासून काही अंतरावर बसचा आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला,यामधून 54 वारकरी प्रवास करत होते त्यातील तीन वारकरी आणि ट्रॅक्टर मधील दोन अशा एकूण पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 46 जखमी वारकऱ्यांवर कळंबोली येथील महात्मा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील सात वारकरी गंभीर जखमी असल्यामुळे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

त्या वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत

मुंबई पुणे महामार्गावर झालेल्या वारकऱ्यांच्या बस अपघाताच्या घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांना मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महात्मा गांधी रुग्णालयात जाऊन प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.जखमी वारकऱ्यांवरील उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल असे जाहीर केले. या घटनेमध्ये पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली .

सीएमचे चौकशीचे आदेश

झालेल्या अपघाताची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीमध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल मात्र जखमी झालेल्यांचा जीव वाचवणे आवश्यक आहे आणि आम्ही त्याला प्राधान्य देतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+