Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कुर्ला अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Kurla bus accident : कुर्ल्यात 9 डिसेंबरला झालेल्या अपघातात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला असून या मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 पाच लाखांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. कुर्ल्यात झालेल्या भीषण अपघातानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पोस्टमध्ये?

देवेंद्र फडणवीस म्हणाले " कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचे मृत्यू झाले, त्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो."

Kurla bus accident

या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

संजय मोरे हा घाटकोपर पश्चिमेला असणाऱ्या असल्फा परिसरात राहतो असे सांगितले जात आहे. संजय मोरे याच्यावर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. चौकशीदरम्यान संजय मोरे यांच्या कुटुंबीयांनी तो दारु पीत नसल्याचे सांगितले आहे. संजय मोरे यांनी 10 दिवस ट्रेनिंग घेतले होते. त्यानंतर त्यांना इलेक्ट्रीक बस चालवण्यासाठी देण्यात आली होती.

Kurla bus accident

असा घडला अपघात..

प्राप्त माहितीनुसार, 9 डिसेंबरला सायंकाळी जवळपास साठ प्रवाशांनी भरलेली बस कुर्ल्याहून अंधेरीकडे जाण्यासाठी निघाली. दरम्यान, अचानक या बसने धडक द्यायला सुरवात केली. कुर्ला एलबीएस मार्गावरच्या मार्केटमध्ये भरधाव वेगानं ही बस शिरली. जेव्हा हा अपघात घडला तेव्हा अपघातग्रस्त बस मध्ये तब्बल 60 प्रवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या संपूर्ण अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला आहे.

ब्रेक फेल झाल्यास बस पुढे जाऊ शकत नाही -तज्ज्ञ

दरम्यान या दुर्घटनेनंतर बसचे ब्रेक फेल झाल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. परंतु, बसचे जर ब्रेक फेल झाले तर बस पुढे जातच नाही अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे असे तज्ज्ञ सांगत असून कंपनीकडूनही अशीच माहिती समोर येत आहे. त्यामुळे ब्रेक फेल झाले हे प्रथमदर्शनी समोर आलेले कारण फारसे ठोस असेल हे मात्र स्पष्ट सांगता येत नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+