Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौ-यात महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, एका दिवसात 6,25,457 कोटींचे करार

Cm Devendra Fadnavis Davos Tour : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दावोसच्या दौ-यावर आहेत. या दौ-यात मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक खेचून आणली आहे. दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत (World Economic Forum) पहिल्या दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 6,25,457 कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे करार केले आहेत.

एकाच दिवसात इतक्या मोठ्या रकमेचे करार करणे हा एक नवा विक्रम आहे. दरम्यान आज दुसऱ्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रासाठी गुंतवणूक करार होणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल सामंजस्य करारांच्या व्यतिरिक्त विविध कंपन्यांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या आहेत. महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी त्यांना निमंत्रित केलं आहे. टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचीही काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. टाटा समूह महाराष्ट्रात 30 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.

Cm Devendra Fadnavis Davos

फोटो सौजन्य - CMO Maharashtra

काल्सबर्ग समूहाचे सीईओ जेकब अरुप अँडरसन यांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. काल्सबर्ग समूहाने महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा व्यक्त केली असून त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. तसेच रिटेल क्षेत्रात कार्यरत लुलू समूहाचे प्रबंध संचालक एमए युसुफ अली यांचीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट घेतली आहे. त्यांनी नागपुरात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली असून महाराष्ट्रातही त्यांनी विस्तार करण्याची तयारी दर्शविली आहे.

रिन्यू पॉवरचे अध्यक्ष आणि सीईओ सुमंत सिन्हा यांचीही त्यांनी भेट घेतली. बीड जिल्ह्यात 15,000 मेवॉ पाईपलाईन आणि पवन ऊर्जा प्रकल्पाबाबत यावेळी चर्चा झाली. त्याबरोबरच शिंडर इलेक्ट्रीक इंडियाचे प्रबंध संचालक आणि सीईओ दीपक शर्मा यांचीही त्यांनी भेट घेतली.

जागतिक बँकेच्या मदतीने राज्यातील आयटीआयच्या सक्षमीकरण कार्यक्रमात तसेच ऊर्जा क्षेत्रात एआयच्या वापराबाबत सहकार्य करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. अहिल्यानगर आणि नाशिक येथे विस्तार करण्याच्या त्यांच्या योजनांचेही सूतोवाच शर्मा यांनी केलं आहे.

मास्टरकार्ड, एपीएसीचे अध्यक्ष लाईंग हाई यांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. लुईस ड्रेफसचे सीईओ मायकेल ग्लेंची यांच्याशी शेती, अन्नप्रक्रिया, आंतरराष्ट्रीय शिपिंग आणि वित्तीय क्षेत्राबाबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. शेतीच्या क्षेत्रात अधिक सहकार्य वाढविण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+