अकोल्यात दोन गटांत तुंबळ राडा; चारचाकी जाळली, सहा जण गंभीर तर एक...

अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील हातरुन गावातून एक मोठी बातमी समोर येत आहे. या गावात दोन गटात तुंबळ राडा झाला. त्यातून हाणामारी होऊन सहा जण जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते. एका गटाने चारचाकी वाहन पेटविल्यानंतरही त्यात चार जण जखमी झाल्याचे समजते. जखमींवर सध्या अकोले जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हातरुन गावात मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Akola Police

नेमके काय झाले

हातरुण येथे एका गटाने काही दिवसांपूर्वी दुसऱ्या गटाविरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. याच तक्रारीवरुन आज दुपारी या दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. त्यात एक चारचाकी वाहनही जाळण्यात आले. हा वाद सायंकाळी उशीरापर्यंत धुमसत होता. हाणामारीच्या घटनेत सहा जण गंभीर जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेनंतर तत्काळ पोलिसांचा मोठा फौजफाटा हातरुन गावात दाखल झाला.

सहा जण गंभीर

या हाणामारीच्या घटनेत सहा जण गंभीर जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींवर अकोले शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून सध्या तणावपूर्ण शांतता पसरली आहे. पोलिसांनी गावात बंदोबस्त तैनात केला असून, वरिष्ठ पोलिसही घटनेवर लक्ष ठेऊन आहेत. रात्री उशीरा अजूनही काही संशयीतांना ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+