Cidco Lottery :सिडकोची 26 हजार घरांची लॉटरी, घर हवंय, अर्ज कसा करावा, वेबसाईट, कागदपत्रं काय लागणार?
Cidco Lottery 26 thousand houses : सिडकोने दिवाळी, दसऱ्यांपुर्वी मोठी खूशखबर दिली आहे. सिडकोने 26 हजार घरांसाठी लॉटरी काढली आहे. यामुळे सामान्यांचे घरांचे स्वप्न पुर्ण होणार आहे. खासकरुन दसरा, दिवाळीच्या तोंडावर ही घरं मिळणार आहेत. त्यामुळे आनंद नक्कीच द्विगुणित होणार हे नक्की.
जर तुम्हाला घरच हवंय तर सिडकोची सोडत तुमचं स्वप्न साकार करु शकते पण सिडकोचे घर मिळवण्यासाठी सोडतीत सहभागी होण्यासाठी अर्ज कसा करायचा, वेबसाईट, कागदपत्रं काय लागतात हे जाणून घेणे आवश्यक आहे आणि हीच माहिती आम्ही तुमच्यासाठी देत आहोत.

आजपर्यंत हजारो नागरिकांनी मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरात सिडकोच्या माध्यमातून हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण केले आहे. पावेळी देखील सिडोकडून मोठ्या प्रमाणात घरांच्या विक्रीसाठी जाहीरात काढली जाणार आहे. सध्या सिडकोचे 27 ठिकाणी 67 हजार घरांचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यातील 43 हजार घरांना महारेरा'ने परवानगी दिली आहे. या सर्व घराचे बांधकाम प्रगतीपथावर असून यातील 25 हजार घरांच्या विक्रीसाठी दसऱ्याआधी सिडकोकडून जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.
आम्ही तुम्हाला सिडकोच्या लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा (How To Apply For CIDCO Lottery 2024) आणि त्यासाठी कोणते कागदपत्रे (Documents for CIDCO Lottery 2024) आवश्यक आहेत हे सांगत आहोत.
सिडको लॉटरीसाठी आवश्यक कागदपत्रे
- पॅन कार्ड आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- उत्पन्नाचा दाखला
- मतदार ओळखपत्र
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- जन्म प्रमाणपत्र
- अर्जदारांचा पत्ता, बँक डिटेल्स
सिडको लॉटरीसाठी असा करा ऑनलाइन अर्ज?
- CIDCO च्या अधिकृत https://lottery.cidcoindia.com वेबसाइटवर जायचे आहे.
- अर्ज करण्यासाठी 'Register for lottery' पर्याय निवडा.
- आता तुमचा पत्ता, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँक खात्याचे तपशील भरा
- त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रांची स्कॅन कॉपी डिजिटल स्वरूपात अपलोड करा
- यानतंर तुम्ही भरलेला ऑनलाइन अर्ज नीट काळजीपूर्वक वाचा आणि सर्व तपशील तपासा.
- तुम्ही भरलेली सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री झाल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट करा.
- नोंदणी शुल्क भरल्यानंतर तुम्ही निवडलेल्या उत्पन्न गटानुसार पेमेंट करा.
- ऑनलाइन बँकिंग किंवा क्रेडिट/डेबिट कार्ड अशा पर्यायांचा वापर करून पेमेंट करू शकता.
- अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्ही फॉर्मची प्रिंट काढू शकता. त्यामुळे प्रिन्ट काढा आणि तुमच्याकडे ठेवा.
- ---












Click it and Unblock the Notifications