मोठी बातमी..! वाल्मिक कराड पोलिसांत आत्मसमर्पण करणार? सुपरफास्ट घडताहेत घडामोडी
सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य संशयीत आरोपी वाल्मिक कराड हा पुढच्या काही तासांत पोलिसांत आत्मसमर्पण करेल, अशा शक्यता वाढल्या आहेत. गेल्या २४ तासांपासून सीआयडी व पोलिसांच्या कारवाया लक्षात घेता, हे शक्य असल्याचे काहींचे म्हणणे आहे. सीआयडीने १५० पोलिसांच्या ९ टीम तयार केल्या असून, या प्रकरणातील सर्व आरोपी पुढील काही तासांत जेरबंद होतील, अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत.

सीआयडीने नाक दाबले
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीच्या पथकाने वेगाने हालचाली केल्या आहेत. वाल्मिक कराडसह त्याच्या नातेवाईकांची बँक खाती गोठविण्यात आल्याची माहिती मिळत आहे. शिवाय फरार आरोपींची संपत्तीही जप्त करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. सीआयडीने सुमारे १५० पोलिसांची नऊ पथके तयार केली असून, ती पथके फरार आरोपींचा कसून शोध घेत आहेत. नाक दाबल्याने आता तोंड उघडेल अशी स्थिती सध्या तयार झाली आहे.
मोबाईल प्रयोगशाळेत
हत्येत वापरण्यात आलेली स्कार्पिओ गाडी पोलिसांनी जप्त केली. आता या गाडीत सापडलेले मोबाईल प्रयोगशाळेकडे पोठविण्यात आले आहेत. या प्रकऱणातील सर्व काँल्स, व्हाट्सअँप चॅट तपासण्याचे काम सुरु आहे. आरोपींसह त्यांच्या सर्व नातेवाईकांची बँक खाती गोठवल्यामुळे संशयीत आरोपी वाल्मिक कराड पुढच्या काही तासांत आत्मसमर्पण करेल, अशी शक्यता आता व्यक्त केली जात आहे.
अनेकांची चौकशी सुरु
सीआयडीच्या पथकाने आत्तापर्यंत सुमारे १०० हून अधिक लोकांची चौकशी केली. शिवाय सर्व काँलही तपासले आहेत. सर्व तांत्रिक बाबींचा अहवाल येत्या काही तासांत सीआयडीच्या हाती येईल. व्हाट्सअँपद्वारे केलेल्या व्हिडीओ काँलची माहितीही पोलिसांनी संबंधीत अँपकडून मागविली आहे. गेल्या २४ तासांत सीआयडीने वेगाने पावले उचलली असल्याने लवकरच सर्व आरोपी हाती लागतील, या शक्यता वाढल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications