जगज्जेत्या टीम इंडियाच्या मुंबईकर खेळाडूचा मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
मुंबई - टी- ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला नमवत जगज्जेदेतपद मिळवणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे सर्वत्र कौतूक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्वच राजकीय नेत्यांनी भारतीय संघाचे भरभरून कौतूक केले.

त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी कर्णधार रोहित शर्मासह भारतीय संघाचे समस्त महाराष्टीयन जनतेच्या वतीनं स्वागत करण्यात आलं.
# Live📡| 05-07-2024
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 5, 2024
📍वर्षा निवासस्थान, मुंबई
📹 जगज्जेत्या भारतीय क्रिकेट संघाचे वर्षा निवासस्थानी स्वागत https://t.co/TSiJXnHFzw
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या एक्स हँडलवर याबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह कर्णधार रोहित शर्मासह टीममधील इतर खेळाडू आणि काही राजकीय पदाधिकारीही दिसत आहेत. कालच जगज्जेत्या भारतीय संघाचे समस्त मुंबईकरांनी स्वागत केले, त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी भारतीय संघाला शासकीय निवासस्थान वर्षा येथे निमंत्रित केले.
चाहत्यांचा जल्लोष, डोळ्यांचे फिटले पारणे
जगज्जेता भारतीय संघ मायदेशी दाखल झाल्यानंतर काल मुंबईत टीम इंडियाची विजयी रॅली काढण्यात आली. यावेळी अफाट गर्दी दिसून आली. या गर्दीने नजरेचे पारणे फेडले. टी-ट्वेंटीचा विश्वकप दुसऱ्यांदा मिळवल्यानंतर समस्त भारतीयांची मान या खेळाडूंनी जगात उंचावली. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांनी विजेत्या संघावर भरभरुन कौतूकाचा वर्षाव करीत त्यांचे आभारही मानले.












Click it and Unblock the Notifications