ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा

मुंबई : राज्यात 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' सुरु करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. विधानसभेत बोलत असताना मुख्यमंत्री शिंदे यांनी ही माहीती दिली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधीद्वारे ही मागणी केली होती.

Cm Eknath Shinde

ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शनाला जाण्याची इच्छा असते, पण आर्थिक स्थिती नसल्याने ते जाऊ शकत नाहीत. त्यामुळे ही योजना लागू केल्यास ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन करता येईल, अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी केली होती. त्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना लागू केली आहे. महाराष्ट्र संताची भुमी आहे. पांडुरंगाची वारी सुरु आहे. आपण पहिल्यांदाच 20 हजार रुपये दिंडीला अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. एकनाथ शिंदे यांनीच विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना या घोषणेसंदर्भात व योजनेसंदर्भात माहिती दिली.


सर्वधर्मीयांसाठी असणार ही योजना

ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना लागू करणार आहे. मुख्यमंत्री तीर्थ योजना सुरु करत असताना नियमावली ठरवू, खर्च आणि इतर बाबी पाहू. चार धाम, हिंदू, जैन, ख्रिश्चन, शीख, बौद्धांची तीर्थक्षेत्र आहेत. हज यात्रेला जातात तसं इतर धर्मीय आपल्या तीर्थक्षेत्राला जात असतात. पण ज्येष्ठांना आर्थिक अडचणीमुळे जाता येत नाही. त्यामुळे ज्यांना जिथे जायचं आहे. त्यांना तिथे घेऊन जाणार आहे. त्यासाठीच ही योजना आहे, ही योजना सर्व धर्मीयांसाठी असेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

कालच्या अर्थसंकल्पात आम्ही वारकऱ्यांसाठी आम्ही घोषणा केली. लाडक्या बहिणींसाठीही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना केली. बेरोजगार सुशिक्षित तरुणांसाठी अॅप्रेंटिसची योजना केली. त्यामध्ये मुलांना १० हजार रुपये देण्यात येणार आहेत. मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांसाठीही आम्ही मोठा निर्णय घेतला असल्याचे ही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+