१६ लाख कोटींची गुंतवणूक व मिळणार १६ लाख नोकऱ्या; फडणवीसांनी सांगितला दावोसमधील बोलबाला
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या स्वीत्झर्लंडमधील दावोस येथे आहेत. तेथे सध्या वर्ल्ड इकाँनाँमिक फोरम सुरु आहे. या फोरममधील महाराष्ट्राचा बोलबाला आज मुख्ममंत्री देवेंर्द फडणवीस यांनी ऑनलाईन पत्रकार परिषद घेऊन विषद केला. महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत १६ लाख कोटींची गुंतवणूक होणार असून त्यातून सुमारे १६ लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात १६ लाख रोजगार
या पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात १६ लाख रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. ६१ एमओयू सोबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत. देश विदेशातील गुंतवणुकीमुळे महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. हे करार मराठवाडा, विदर्भ, नाशिकसाठी करण्यात आले आहेत. राज्यातील सर्वच क्षेत्रांत हे सामंजस्य करार झाले असल्याच माहितीही त्यांनी दिली.
१६ लाख कोटींचे उद्योग
या करारातून महाराष्ट्रात १५ लाख ७० कोटींची गुंतवणूक होणार आहे. औद्योगीक मॅग्नेट क्षेत्रात एमओयू केले असल्याचेही त्यांनी सांगितले. दावोस मध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला राहीला, अशी माहितीही फडणवीसांनी या पत्रकार परिषदेत दिली. भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दीष्ट साध्य करायचे असले तर प्रत्येक राज्याने सक्षम व्हायला हवे, असेही त्यांनी सांगितले.












Click it and Unblock the Notifications