Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडजवळ भीषण अपघात! 3 मित्रांचा मृत्यू, दोघे गंभीर..कसा घडला अपघात? वाचा

Chhatrapati Sambhajinagar News Fatal car accident near Sillod : छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड शहरात ढाब्यावर जेवण करुन येणाऱ्या तरुणांच्या कारचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पाचपैकी तीन जण ठार झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना २४ जून रोजी मध्यरात्रीनंतर घडली.

प्राप्त माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर ते जळगाव राष्ट्रीय मार्गावर बिल्डा फाट्याजवळ मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत पाचपैकी तीन जण जागीच ठार झाले तर दोघांना गंभीर इजा झाली. त्यांच्यावर रुग्णालायात उपचार सुरु आहेत.

Chhatrapati Sambhajinagar News

मीडिया रिपोर्टनुसार, सय्यद मारुफ सय्यद माजेद (वय १८), अरफात बागवान (वय २०), रेहान सय्यद (रा. सर्व मोतीलालनगर, छत्रपती संभाजीनगर) अशी मृतांची नावे आहेत तर याच घटनेत सय्यद उजेफ आणि शेख शारीक हे गंभीर जखमी झाले आहेत.

कसा झाला अपघात

छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असेलेले पाचही जण कार (क्रमांक एम.एच.२० इ.जे. १५८६) ने फुलंब्राहून छत्रपती संभाजीनगरकडे येत होते. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास त्यांची कार बिल्डा गावानजीक पुलावरील दुभाजकाला जोरात धडकली. यानंतर ही कार उलटली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला. घटनेनंतर फुलंब्री पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य केले. या अपघातानंतर जखमी दोघांवर छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+