Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

छत्रपती संभाजीनगरचा महापौर कोण? भाजपमध्येच नावांची रस्सीखेच, 'या' नेत्यांची भूमिका ठरणार निर्णायक

Who Will Be the Next Mayor of Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्याच्या राजकारणात महत्त्वाची मानली जाणारी छत्रपती संभाजीनगर महापालिका अखेर अस्तित्वात आली असली, तरी आता खऱ्या अर्थाने सत्तासंघर्षाला सुरुवात झाली आहे. महापालिकेचा निवडणूक निकाल जाहीर झाला असला, तरी शहराचा पहिला नागरिक कोण होणार, याबाबतची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्याने महापौरपदावर 'कमळ'च विराजमान होणार, हे जवळपास निश्चित मानले जात असले तरी कोणता चेहरा पुढे येणार, यावरून पक्षांतर्गत रस्सीखेच रंगली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Mayor

सर्वसाधारण प्रवर्गासाठी महापौरपद खुले; भाजपला दिलासा

महापौरपदाच्या आरक्षणावरून सुरुवातीला मोठी धुसफूस होती. जर हे पद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले असते, तर भाजपची मोठी अडचण झाली असती, अशी कबुली खुद्द पक्षातील नेत्यांकडून दिली जात होती. कारण त्या प्रवर्गात भाजपकडे उमेदवार नसून, फक्त एमआयएमकडेच पर्याय उपलब्ध होते. मात्र अखेर महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाल्याने भाजपसह इतर राजकीय घटकांनीही सुटकेचा श्वास घेतला आहे.

भाजपची ताकद, पण बहुमत एका जागेने कमी

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने दमदार कामगिरी करत ५७ नगरसेवक निवडून आणले आहेत. बहुमताच्या आकड्यापासून भाजप फक्त एका जागेने दूर असला, तरी प्रत्यक्ष राजकीय गणित पाहता भाजपचा महापौर बसण्याचे चित्र सध्या स्पष्ट दिसत आहे. भाजपला पाठिंबा देणारा एक नगरसेवक कोण असेल, यावर अद्याप पडदा आहे. मात्र शहराचा कारभार स्थिर आणि सक्षमपणे चालवू शकणारा उमेदवार महापौर व्हावा, अशी भावना भाजप समर्थकांमध्ये आहे.

Chhatrapati Sambhajinagar Mayor

महापौरपदासाठी या नावांची जोरदार चर्चा

सध्या भाजपमध्ये महापौरपदासाठी आठ नगरसेवकांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये अनिल मकरिये, राजगौरव वानखेडे, महेश माळवतकर, विजय औताडे, शिवाजी दांडगे, समीर राजूरकर, सुरेंद्र कुलकर्णी आणि रेणुकादास वैद्य या नावांचा समावेश आहे.

यापैकी महापालिका निवडणुकीत प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळलेले समीर राजूरकर यांचे नाव सध्या आघाडीवर मानले जात आहे. निवडणूक व्यवस्थापनातील त्यांचा अनुभव, संघटन कौशल्य आणि पक्षातील सक्रिय भूमिका यामुळे ते मजबूत दावेदार ठरत असल्याचे भाजपच्या वर्तुळात बोलले जात आहे.

फक्त लोकप्रियता नाही, तर प्रशासन चालवण्याची क्षमता महत्त्वाची

भाजपमधील अंतर्गत चर्चांमध्ये केवळ राजकीय ताकद किंवा मताधिक्य नव्हे, तर प्रशासकीय समज, कायद्याचे ज्ञान, सभागृहातील कामकाजाची जाण, पारदर्शक कारभाराचा दृष्टिकोन या मुद्द्यांनाही मोठे महत्त्व दिले जात आहे. महाराष्ट्र नगरपंचायत व नगरपालिका कायद्याचे सखोल ज्ञान असलेला, सर्वसाधारण सभेत ठाम आणि स्पष्ट भूमिका मांडणारा मूळ भाजपचा नगरसेवकच महापौर व्हावा, अशी मागणी पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांकडून होत आहे. त्यामुळे यावेळी केवळ लोकप्रियतेवर नव्हे, तर प्रशासन चालवण्याच्या क्षमतेवर महापौरपदाचा फैसला होण्याची शक्यता आहे.

सावे-कराडांची भूमिका ठरणार निर्णायक

या संपूर्ण प्रक्रियेत मंत्री अतुल सावे आणि खासदार डॉ. भागवत कराड यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. भाजपच्या कोअर कमिटीत हे दोन्ही नेते कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, यावर महापौरपदाचा निर्णय मोठ्या प्रमाणावर अवलंबून असेल. कोणती राजकीय समीकरणे, संघटनात्मक गणिते आणि आगामी पाच वर्षांचा विकास आराखडा डोळ्यांसमोर ठेवून निर्णय घेतला जातो, याकडे कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांचेही लक्ष लागले आहे.

पुढील 5 वर्षांची दिशा ठरवणारा निर्णय

छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा निकाल लागला असला, तरी सत्ता स्थापनेची खरी लढाई आता रंगात आली आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्याने अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत, मात्र त्याचबरोबर जबाबदारीही तितकीच मोठी आहे. महापौरपदाचा निर्णय हा केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित न राहता, पुढील पाच वर्षांत शहराचा विकास, प्रशासन आणि राजकीय दिशा ठरवणारा ठरणार आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+