संभाजीनगर हादरलं! माहेराहून पैसे आणण्याची धमकी, विवाहितेस दोरीने बांधून पायाला चटके अन् मारहाण
Chhatrapati Sambhajinagar Crime News : महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. विशेषत: हुंडाबळीचे प्रकरण देखील पुन्हा महाराष्ट्रात होऊ लागली आहे. पुण्यातील वैष्णवी हगवणेचे प्रकरण ताजे असतानाच छत्रपती संभाजीगनर जिल्ह्यातील देखील भयावह घटना समोर आली. माहेरून पैसे घेऊन ये असं म्हणत तीस वर्षीय विवाहितेला घरात बांधून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील ही घटना आहे.

दोरीने बांधून दिले चटके
विवाहितेला मारहाणी केली गेलीच, त्याचबरोबर तिला दोरीने बांधून चटके देण्यात आले. सासरच्या लोकांकडून झालेल्या निर्दयी मारहाणीमध्ये विवाहिता गंभीर जखमी झाली आहे .फुलंब्रीच्या चौकावाडी येथे घडलेल्या या संतापजनक प्रकारामुळे घरगुती हिंसाचार आणि छळवणुकीमुळे छत्रपती संभाजीनगर हादरले आहे.
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच राज्यभरातून हुंड्यासाठी पैशांचा तगादा, घरगुती हिंसाचार, हुंड्यातून जन्माला आलेली अमानुष मारहाणीची प्रकरणे उघडकीस येऊ लागली आहे.
नेमके प्रकरण काय?
माहेरून पैसे घेऊन ये नाहीतर परिणाम भोग, असं म्हणत 30 वर्षीय विवाहितेला दोरीने बांधून बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना फुलंब्री तालुक्यातील चौकावाडी येथे उघडकीस आली आहे. तिला चटके देण्यात आले. यात विवाहिता गंभीर जखमी झालेली आहे.
पती अन् दोन नणंदांवर गुन्हा दाखल
पती अजीम अब्दुल शेख, नणंद शबाना निसार शेख, आणि रिजवाना इम्रान शेख यांनी शारिरीक व मानसिक छळ केला. माहेरून पैसे आणावेत, या कारणावरून तिला दोरीने घरात बांधून अमानुष मारहाण केली.
या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित तीघांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी या आरोपींचा शोध सुरू केला आहे.












Click it and Unblock the Notifications