पवारांनी भुजबळांना दिलेल्या चिठ्ठीत काय होतं..? भुजबळांच्या 'परदे मे रहने दो'चा अर्थ काय..?

महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे गेल्या आठवड्यात चाकणला लोकार्पण झाले. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार व छगन भुजबळ हे एकाच व्यासपिठावर शेजारी-शेजारी बसले होते. याच कार्यक्रमात शरद पवारांनी निमंत्रण पुत्रिकेवर संदेश लिहून ती पत्रिका भुजबळांच्या हातात दिली होती. भुजबळांनी तो मजकूर गुपचूप वाचून फक्त स्मितहास्य केले होते. आता या चिठ्ठीत काय लिहलं होतं, याचं उत्तर स्वतः भुजबळांनी दिलं.

Sharad Pawar

नेमकं काय झालं होतं?

चाकणमधील या कार्यक्रमासाठी शरद पवार व छगन भुजबळ हे दोघेही एकाच व्यासपीठावर आले होते. भुजबळ कार्यक्रमाला उशीरा आले. हे दोघेही शेजारी बसल्यानंतर बराच वेळ त्यांच्याच चर्चा झाली नाही. नंतर शरद पवारांनी त्यांच्या हातातील निमंत्रण पुत्रिकेवर काहीतरी लिहलं. त्यानंतर ही पत्रिका शेजारी बसलेल्या भुजबळांच्या हातात दिली. भुजबळांनीही तो संदेश गुपचूप वाचला. त्यानंतर या दोघांनी एकमेकांकडे पाहून स्मितहास्य केले. आता पवारांनी काय लिहले व भुजबळांनी काय वाचले, याची चर्चा महाराष्ट्रभर रंगली.

भुजबळांनी दिले उत्तर

याच प्रश्नाचा धागा पकडून आज पत्रकारांनी भुजबळांना बोलते केले. शरद पवारांनी त्या चिठ्ठीवर काय लिहले होते, असा प्रश्न पत्रकारांनी भुजबळांना विचारला. त्यावर भुजबळ म्हणाले, त्यावर काय लिहिलं ते कसं सांगू..? ते परदे मे रहने दो, पर्दा ना उठाओ " असं म्हणत छगन भुजबळ मनसोक्त हसले. त्यांनी मोठ्या खुबीने हा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला. पर्दा ना उठाओ असं तुम्ही म्हणताय, की पवारांनी त्या चिठ्ठीत तसं लिहीलं होतं, असा सवाल एका पत्रकाराने पुन्हा विचारलाच. त्यावरही भुजबळ म्हणाले, मी सांगितलं ना, उत्तर दिलं की आता, असं हसत हसत म्हणत त्यांनी तो विषय डावलला. त्या चिठ्ठीतून नेमकं काय लिहलं होतं हे गुपित गुलदस्त्यातच राहिलं.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+