भुजबळांनी केली धनंजय मुंडेंची पाठराखण; म्हणाले- त्यांनी का राजीनामा द्यावा?, आरोप तर सिद्ध होऊ द्या
Chhagan Bhujbal on Dhananjay Munde : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक झालेले आरोपी हे मंत्री धनंजय मुंडे यांच्याजवळील आहेत. आरोपींना पाठिशी घालण्याचे काम धनंजय मुंडे करत आहेत, असा आरोप विरोधकांकडून होत असून धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. यावर आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे.
छगन भुजबळ काय म्हणाले?
छगन भुजबळ म्हणाले की, एखाद्या व्यक्तीवर आरोप होत असेल तर ते सिद्ध तर झाले पाहिजेत ना, फक्त आरोप करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी का करावी. राजकारणात आल्यानंतर अनेक संघर्षानंतर मंत्रिपद मिळत असते. मग त्यांचा राजीनामा मागणे उचित ठरणार नाही. अन् त्यांनी का म्हणून राजीनामा द्यायचा?

छगन भुजबळ म्हणाले की, या प्रसंगातून मी देखील गेलो आहे. तेलगी घोटाळा प्रकरण मी पुढे आणले. त्यावर मोक्का मी लावला. परंतु, विरोधकांनी माझ्यावरच आरोप केला. परिणामी मला खोटे आरोप करत माझा राजीनामा मागितला. त्याचा परिणाम मला भोगावा लागला. मला व माझ्या कुटुंबियांना त्रास सहन करावा लागला. परंतु, मीच अखेर सुप्रीक कोर्टात जाऊन पुन्हा याचा तपास सीआयडीकडे दिला त्यानंतर माझी चौकशी झाली. यात माझा काहीही संबंध नव्हता हे सिद्ध झाले.
त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले जात आहेत. त्यावरुन त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही, त्यांच्याविरोधातील काही पुरावे असतील ते जरूर पोलिसांना द्यावे. त्यावर चौकशी होऊन मग कारवाई केली जाईल.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications