अरं बाबा, तुला काय करायचं ते ठरवं! माझ्याविरोधात लढ; छगन भुजबळाचं जरांगेंना आव्हान
Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange : मराठा समाजाचे उमेदवार विधानसभा निवडणुकीला उभे करु आणि सत्ताधाऱ्यांना सत्तेतून पायउतार करु, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सातत्याने दिला जात आहे. जरांगे यांच्या या इशाऱ्यावर मंत्री भुजबळ यांनी जरांगेंनाच खुलं आव्हानं दिलं आहे. अरे बाबा, जरांगे, तू स्वत: माझ्यासमोर उभं राहा, मला पाडलं तरी माझा आवाज बंद होणार नाही, असाही इशारा त्यांनी जरांगे यांना दिला. एका मराठी वृत्तवाहिणीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
मराठा ओबीसी वादात मनोज जरांगे विरुद्ध छगन भुजबळ यांच्यातील वाद आता सर्वश्रुत आहे. जरांगे यांनी सातत्याने त्यांच्या भाषणांमध्ये भुजबळ यांना टारगेट केलेले आहे. तर भुजबळ यांनी देखील जरांगे यांच्यावर सातत्याने हल्लाबोल केला आहे. एकदरींत दोन्ही नेत्यामधील वाद अतिशय टोकावर गेल्याचे अनेकदा पाहायला मिळत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सातत्याने मराठा आरक्षणावर भूमिका मांडताना, आपली मागणी मान्य झाली नाही तर सत्ताधारी पक्षाचे आमदार पाडू, असा इशारा त्यांच्याकडून दिला जात आहे. याच इशाऱ्याबाबत वृत्तवाहिणीच्या कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी जरांगे यांनाच ओपन चॅलेंज दिले.

काय म्हणाले छगन भुजबळ?
छगन भुजबळ म्हणाले की, अरे बाबा तू स्वत: माझ्यासमोर उभं राहयला ये. माझी इच्छा आहे. त्यांनी स्वत: माझ्यासमोर येऊन उभं राहावं. मुळात भुजबळांना पाडलं तरी भुजबळांचा आवाज बंद होणार नाही. ओबीसींचं आरक्षण आणि संरक्षण करणं माझं काम आहे. सरकारमध्ये असो की बाहेर आवाज उठवणं हे भुजबळांचं काम आहे. या 57-58 वर्षात रस्त्यावर आणि सरकारमध्ये काम करण्याची सवय आहे. येवल्यात कोणीही आले तरीही भुजबळ लाख मते घेऊन विजयी होणार, असा दावा देखील त्यांनी केला.
उपोषणाला बसतो अन् पुन्हा उठतो
पुढे बोलताना भुजबळ म्हणाले की, मनोज जरांगे यांनी रोज भूमिका बदलू नये. 288 उमेदवार तुम्ही उभे करणार आहात. तुमच्या हिंमत असेल तर 288 उमेदवार उभे करा. आमचं आव्हान आहे. प्रत्येकवेळी कशा बदलता? उपोषणाला बसतो म्हणतात आणि उठतो. मग म्हणतात मुस्लिमांना आरक्षण द्या. अहो मुस्लिमांना आम्ही आरक्षण दिलं. माहीत नसलेल्या गोष्टीवर ते बोलतात. अर्धवट माहिती असलेले लोक बोलतात. काही वेळा मध्येच उठतात अन् म्हणतात मला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे अरे बाबा तुला काय करायचं ते कर, असा खोचक टोला देखील भुजबळांनी लगावला.












Click it and Unblock the Notifications