Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

धक्कादायक ! छगन भुजबळांच्या निधनाच्या अफवेमुळे खळबळ! नेमकं काय घडलं?

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या निधनाची बनावट बातमी सोशल मीडियावर पसरवण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एका यूट्यूब चॅनलवरून ही अफवा पसरवण्यात आली असून, यामध्ये एका नामांकित टीव्ही वाहिनीचा बनावट लोगो वापरण्यात आला होता. या प्रकरणी नाशिक सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

chhagan bhujbal fake news

भुजबळांच्या निधनाची अफवा, खोटा व्हिडिओ व्हायरल

एका अज्ञात व्यक्तीने यूट्यूबवर 'मंत्री छगन भुजबळ यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाले' अशा आशयाचा व्हिडिओ टाकला होता. यामध्ये प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या लोगोचा गैरवापर करण्यात आला. विशेष म्हणजे, या व्हिडिओमध्ये प्रत्यक्षात भुजबळ यांनी दिवंगत रंजनीताई बोरस्ते यांना श्रद्धांजली वाहिलेली होती. मात्र, व्हिडिओमध्ये त्यांच्या स्वतःच्या निधनाचा चुकीचा संदेश तयार करून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला.

पोलीस अधिकाऱ्यांच्या सतर्कतेने कारवाई

विशेष शाखेचे अधिकारी सुनील बहारवाल यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सखोल तपास केला. व्हिडिओतील मजकूर आणि प्रतिमा चुकीच्या पद्धतीने वापरण्यात आल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे समाजात संभ्रम निर्माण होण्याची शक्यता होती. यासंदर्भात 28 जूनच्या रात्री व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून कारवाई करण्यात आली.

@Nana127tv चॅनलविरोधात गुन्हा

या प्रकरणात @Nana127tv नावाच्या यूट्यूब चॅनलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चॅनलचं डिस्प्ले नाव 'हेल्पलाइन किसान' असं आहे. या व्हिडिओला सुमारे एक लाखाहून अधिक लोकांनी पाहिल्याचं समोर आलं असून, त्यामुळे समाजात संभ्रम निर्माण झाला होता. सायबर पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, यामागचा उद्देश आणि आरोपी शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+