Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

..तर ओबीसींसाठी मी रस्त्यावर उतरून लढाई लढेल; छगन भुजबळांचा अजित पवारांना थेट इशारा

Chhagan Bhujbal : ओबीसी नेते आमदार छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने समता परिषद व भुजबळ समर्थक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज झाले आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मंत्रिमंडळात संधी न दिल्यामुळे प्रचंड नाराज झाले आहेत. तर आज नाशिकमध्ये समता परिषदेच्या मेळाव्यातून छगन भुजबळांनी शेरोशाहीरी करत चौफेर फटकेबाजी केली आहे. आम्ही सभागृहात नाही पण, रस्ता तो मेरा है, आम्ही रस्त्यावर लढाई लढू असे म्हणत भुजबळांनी या सभेतून एकप्रकारे एल्गार पुकारला. तर अजित पवारांना त्यांनी नाव न घेता इशाराही दिला.

आम्हाला संपवायला निघालेत, त्यांना विरोध?

छगन भुजबळ म्हणाले की, मी सर्वाचे आभार मानतो की कमी वेळात तुम्ही सर्व आलात. माजी आमदार आणि भविष्यातील आमचे आमदार आलेत. लोकांची मन खिन्न आहेत, काल पासून मी हे बघतोय. कोणीतरी गेल्या सारखी अवस्था आहे. लोकांना धक्का बसला आहे, कोणी त्यातुन बाहेर येत नाही. ही गोष्ट येवला, लासलगाव पूर्ती नाही तर संपूर्ण राज्यात आहे. संपूर्ण देशातून फोन येत आहेत. सर्वाची मागणी आहे, तुम्ही आमच्या शहरात जिल्ह्यात, राज्यात या, लोक पेटून उठत आहेत.

Chhagan Bhujbal attack on Ajit Pawar

मात्र आपण पेटवा पेटवी करायची नाही. तुम्ही निषेध करा, पण जोडे मारो, शिव्या नको. रोज सकाळी 8 वाजता काय चालू आहे, त्याची सगळी माहिती मुख्यमंत्रीपासून सर्वांना होत आहे. इथे सुद्धा मराठा नेते आहेत, निवडणुकीचे सारथ्य देखील मराठा समाजाच्या नेत्यांनी केले. आजही त्यांचे फोन येतात. फुलेंनी शाळा सुरू केली तेव्हाची भिडे यांनी वाडा दिला ते ब्राह्मण होते. काही लोक छोट्या मनोवृत्तीचे होते. पण सपोर्ट करण्यांत मुस्लिम तसेच ब्राह्मण समाजाचे लोक ही होते. सर्व आपले दुष्मन नाही, आपल्याला संपवायला निघाले त्यांना आमचा विरोध कायम आहे.

मैं मौसम नहीं जो पल में बदल जाए..

आता पुन्हा मला सांगतात राज्यसभेत जा. मात्र, ज्यांनी माझ्यासाठी जिवाचं रान केले ते डोके फोडून घेतील. मग आधीच उभे करायला नको होते ना, मी माझ्या लोकांना आता सोडू शकत नाही. प्रफुल्ल पटेल यांनी मध्यस्थी केली, अजित पवार बोलले बसून चर्चा करू, पण अशी बैठक झालीच नाही. प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे यांनी भुजबळ यांना घ्या असे सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही शेवट पर्यंत प्रयत्न केल्याचे सांगितले. दुसऱ्या पक्षातील कोणी सांगितले नाही, पवार साहेबांकडचे फोन आले, बावनकुळे यांचे फोन त्यांना आले. मात्र काहीही झाले नाही. मात्र आता समाजाची ढाल बनून कोण उभा राहील, हा प्रश आहे.

अवहेलना करण्याचे शल्य मला सतावते

आता सर्व दिल्यानंतर असे का प्रश्न उभा होत आहे? या मागे तुमचा हेतू काय? अवहेलना करण्याचे शल्य मनात आहे. उद्या, परवा मी मुंबईला जाणार आहे, आपले ओबीसी नेते फोन करत आहेत, ते भेटायला येणार आहेत. त्याच्याशी चर्चा करून निर्णय घेणार, त्यावेळी तुमची साथ मला हवी आहे.मैं मौसम नहीं जो पल में बदल जाए, मैं ऊस पुराणे जमाने का सिक्का हु, उसे फेक न देना, तुम्हारे बुरे वक्त मे मैं चल जाऊ.. असे म्हणत छगन भुजबळ यांनी आपली रोष व्यक्त केला आहे.

अजून निवडणुका संपलेल्या नाहीत

विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींसोबत ओबीसी समाजाने भरभरून मतदान दिल्यामुळे हे सरकार आले. पण आता आपल्याबाबत वेगळा विचार केला जात आहे. परंतु अजून निवडणुका संपलेल्या नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, असे म्हणत छगन भुजबळांनी यावेळी राष्ट्रवादीसह महायुतीलाही सूचक इशारा दिला.

मेरा वक्त भी बदलेगा, तेरी राय भी बदलेगी

छगन भुजबळ म्हणाले- मला सध्या गावागावातून व जिल्ह्याजिल्ह्यातून फोन येत आहेत. भुजबळ साहेब या, ताकद वाढवा असे लोक म्हणत आहेत. हे खरे आहे. मी आता संपूर्ण राज्यात जाऊन ओबीसींचा एल्गार पुकारणार आहे. मी ओबीसींचा लढा आमदार म्हणून सभागृहात लढेल. तिथे कितीही बंधने आली तरी रस्ते आमच्यासाठी मोकळे आहेत. यावेळी त्यांनी मेरे बारे में कोई राय मत बनाना गालिब, एक ऐसा दौड आएगा मेरा वक्त भी बदलेगा, तेरी राय भी बदलेगी, अशी शायरी म्हणत आपल्या भविष्यातील वाटचालीचे संकेतही दिले.

आमदार किंवा मंत्री होणे माझे काम नाही

छगन भुजबळ म्हणाले, आमदार होणे किंवा मंत्री होणे हे माझे काम नाही. मला मंत्रिपदाची हाव असती तर मी 16 नोव्हेंबरला राजीनामा देऊन 17 नोव्हेंबरला इकडे आलो नसतो. मी राजीनामा दिला होता, पण त्याचा कुठेही उल्लेख केला नाही. कारण मला तसे सारखे फोन येत होते. त्यानंतर अडीच महिन्यांनी मी राजीनामा दिल्याचे उघड केले होते. माझ्याविरोधात अर्वाच्य बोलण्यात आले तेव्ही मी ती गोष्ट उघड केली.

आता प्रश्न मंत्रिपदाचा नाही तर अस्मितेचा आहे. एखाद्या समाजाला बरोबर घेऊन लढणारी माणसे आपल्याकडे आहेत. पण कुणीही दुःखात राहण्याचे कारण नाही. 'कभी डर न लगा मुझे फासला देखकर, मै बढता गया रास्ता देख कर, खुदही खुद नजदिक आती गयी मंजिल मेरा बुलंद हौसला देखकर', असे ते उपस्थितांचे मनोबल वाढवताना म्हणाले.

मनोज जरांगेंवरही साधला निशाणा

छगन भुजबळ यांनी यावेळी मनोज जरांगे व मराठा आरक्षणावरही भाष्य केले. ते म्हणाले, 10 टक्के आरक्षण दिल्यानंतर देशभरातील इतर राज्यांतील आंदोलने शमली होती. पण मराठा समाज हा ईडब्ल्यूएसमध्ये साडेआठ टक्के आहे. त्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे हे माझे नव्हे तर त्यांचेच म्हणणे आहे. मी मार्ग काढण्यास तयार आहे, पण तुमच्याशी चर्चा करण्यास नाही.

आपण कुणीही मराठा विरोधी नाही. पण आपल्यावर कुरघोडी करण्याचा जो कुणी प्रयत्न करत आहे, त्यांना विरोध करणे हे तुमचे व माझे काम असणार आहे. पुन्हा एकदा बीड होता कामा नये. आमदारांची घरे जाळा, शिक्षणसंस्था जाळा या घटना सहन केल्या जाणार नाहीत. त्यावेळी ते घडले आणि मी त्या संकटात उभा राहिलो होतो. तेव्हा जनताच नव्हे तर नेतेही घाबरले होते. पण त्यावेळी हा छगन भुजबळ एकटा उभा टाकला होता.

ओबीसी एक है तो सेफ है!

छगन भुजबळ म्हणाले, आपण सर्वजण एकजूट झालो. ओबीसी मंडळी एकजूट झाली. त्यामुळे एक है तो सेफ है, हे आपल्याला अशाही पद्धतीने समजले. आपण एकजूट राहिलो तरच सुरक्षित राहू हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आम्ही कुणाच्याही आरक्षणाला विरोध केला नाही. ओबीसी आरक्षण मिळाले तेव्हा त्यात 250 जाती होत्या, आता हा आकडा 375 वर गेला आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.

मला सर्व जातीतील लोकांनी निवडून दिले

आपली माणसे राजकारणात अजूनही कच्ची आहेत. जे निवडून येतात ते एकही शब्द बोलत नाहीत. त्यांचे काही चुकत आहे असे मी म्हणणार नाही. पण माझ्याही मतदारसंघात एक सलाईन लावलेला महाशय आला होता. माझे काय होणार हे मला माहिती नाही पण या माणसाला पाडा म्हणजे पाडा असे तो म्हणाला होता. त्यामुळे माझी 60 ते 70 हजार मते कमी झाली. हिंदू - मुस्लिम या सर्वांची मते कमी झाली. दलित, ओबीसी, गुजराती आदी सर्वच समाज एकत्र आले आणि मला निवडून दिले, असे ते म्हणाले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+