Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पहाटेच्या शपथविधीचं षडयंत्र कुणी केलं..? नाराज छगन भुजबळांनी 'त्या' प्रकरणाला घातला हात

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचे प्रकरण आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दोन दिवासांपूर्वी शिर्डीतील राष्ट्रवादीच्या अधिवेशनात मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाला हात घातला होता. आता मुंडे यांच्या याच वक्तव्याचा आधार घेत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा त्या घटनेवर भाष्य केले आहे. भुजबळ यांचे हेच भाष्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Chhagan Bhujbal

काय म्हणाले होते मुंडे?

राष्ट्रवादीच्या शिर्डीतील नवसंकल्प शिबिरातील मंत्री धनंजय मुंडे यांचे भाषण तुफान गाजले होते. मनातील खदखद सांगताना त्यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत गौप्यस्फोट केला होता. ते म्हणाले होते की, पहाटेच्या शपथविधीच्या वेळी मी दादांना विनंती केली होती. शपथ घेऊ नका म्हणून सांगितले होते. हे षडयंत्र आहे, आपला घात होतोय, हे मी दादांच्या पायावर डोकं ठेवून सांगितलं होतं. त्यावेळी दादांनी घात वगैरे काही होत नसतो असं म्हणत त्यांचा निर्णय घेतला. मात्र ते षडयंत्र आत्ता समोर आलं, असं मुंडे यांनी म्हटलं होतं.

काय म्हणाले भुजबळ?

मुंडे यांच्या या वक्तव्याबाबत आज ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, धनंजय मुंडे यांचं भाषण झालं तेव्हा मी तीथे नव्हतो. परंतु आपल्या माध्यमातून सांगतो, ते षडयंत्र होतं तर ते कोणी रचलं होतं? एक तर उद्धव ठाकरे षडयंत्र रचू शकत नाहीत. मग कोणी रचल? काँग्रेस रचू शकत नाही. मग ते राष्ट्रवादीच्या काही लोकांनी रचलं, की भाजपच्या लोकांनी? या षडयंत्राची मला मात्र काहीच माहिती नाही.

भुजबळांनी सांगितली आठवण

भुजबळ पुढे म्हणाले की, मला एवढं मात्र आठवतं, की त्यावेळेला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये बैठका सुरू होत्या. त्यातीलच एका बैठकीमध्ये शरद पवार साहेब आणि खर्गेंचा थोडासा वाद झाला. त्यानंतर पवार साहेब बैठकीमधून रागानं निघून गेले. मात्र त्यानंतरही आमच्या बैठका सुरूच राहिल्या. रात्री आठ वाजता मिटिंग बोलावली गेली. त्या मिटिंगला अजितदादा हजर नव्हते. म्हटलं कुठेतरी कामात अडकले असतील. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा टीव्ही लावला तेव्हा कळालं की अजितदादांचा शपथविधी झाला. त्यानंतर मी पवार साहेबांकडे गेलो. तोपर्यंत पवार साहेबांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता. त्यांनी ठाकरेंना सांगितलं होतं की आपण आता मजबुतीनं उभं राहिला हवं, काहीही घडता कामा नये.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+