शरद पवारांना भेटण्यापूर्वी भुजबळांचा फडणवीसांसोबत एकाच गाडीने प्रवास, राजकारणात शिजतंय काय?

चाकण कृषि उत्पन्न बाजार समितीत आज महात्मा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा होणार आहेत. सायंकाळी चार वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी मंत्री छगन भुजबळ हे एकाच व्यासपिठावर उपस्थित राहणार आहेत. मात्र त्यापूर्वीच सावित्रिबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीचा कार्यक्रम त्यांच्या जन्मगावी म्हणजेच साताऱ्यातील नायगाव येथे सकाळी पार पडला. या कार्यक्रमासही छगन भुजबळ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते. या दोघांनीही कार्यक्रम स्थळापर्यंत एकाच गाडीत प्रवास केल्यामुळे राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

Chhagan Bhujbal

नेमके काय झाले?

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 194 वी जयंती आहे. सातारा जिल्ह्यातील नायगाव या त्यांच्या जन्मगावी आज सकाळी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नायगावच्या वेशीवर तेथील ग्रामस्थांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भल्या मोठ्या पुष्पहाराने स्वागत केले. फडणवीसांसोबत छगन भुजबळ, पंकजा मुंडे, मकरंद पाटील हे नेतेही उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी वेशीपासून स्टेजपर्यंत छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. फडणवीस ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसले होते, तर त्यांच्या मागच्या सीटवर भुजबळ बसले होते. हे चित्र कॅमेऱ्यात कैद झाले आणि चर्चांना उधाण आले.

भुजबळ-पवार येणार एकत्र?

नायगावच्या कार्यक्रमानंतर छगन भुजबळ हे चाकण येथील कार्यक्रमाला येणार आहेत. याच कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवार हेही उपस्थित राहणार आहेत. महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आज संध्याकाळी 4.30 वाजता हा कार्यक्रम होईल. छगन भुजबळांच्या नाराजी नाट्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि भुजबळ हे आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

काय रंगल्या चर्चा?

मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ हे नाराज होते. त्यांनी आपली नाराजी अजित पवारांसमोर बोलून दाखवली. त्यानंतर ते भाजपच्या वाटेवर आहेत, अशा चर्चा सुरु झाल्या. काही जणांच्या मते ते शरद पवार गटात जातील, असेही सांगितले गेले. दरम्यान आज एकाच दिवसात छगन भुजबळ हे अगोदर देवेंद्र फडणवीस व नंतर शरद पवार यांच्यासोबत दिसल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात काही नवीन घडणार का, या चर्चा सुरु झाल्या आहेत. भुजबळ व फडणवीस हे एकाच गाडीत दिसल्याने भुजबळ भाजपाच जाणार या चर्चांना पुन्हा हवा मिळाली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+