छगन भूजबळ अचानक शरद पवार यांच्या भेटीला,राजकीय वर्तूळात चर्चांना उधाण
मुंबई: राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ आज अचानक शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तूळात चर्चांना उधाण आले आहे. कालच भूजबळ यांनी (14 जुलै) रोजी बारामती येथून मराठा आणि ओबीसीच्या मुद्द्यावरुन शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आणि आज सोमवारी सकाळी अचानकपणे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक येथे गेले आहेत.

छगन भुजबळ यांच्या या अचानक भेटीमूळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. छगन भुजबळ अचानक पवारांना भेटायला का आले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
ओबीसी आरक्षणामुळे छगन भूजबळ नेहमीच चर्चेत असतात. शरद पवार यांची तब्येत ठीक नसल्याची माहिती समोर येत आहे . त्यामुळे छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला गेले असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी भुजबळ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या, त्यानंतर भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. मी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार आहे, असे भुजबळ म्हणाले होते.
महाराष्ट्र पेटवण्याचं काम शरद पवार यांनीच केलं- भूजबळ
तुमचा अजित पवार व छगन भुजबळांवर आहे. मग सगळ्या ओबीसी समाजानं तुमचं काय घोडं मारलंय..? असा सवाल करत मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर निशाणा साधला होता. ज्येष्ठ नेते म्हणून आरक्षणाच्या मुद्द्यावर मार्ग काढायचे सोडून, विरोधी पक्षाला काहीतरी सल्ले देऊन ते महाराष्ट्र पेटविण्याचे काम करत आहेत, असा थेट आरोपही भुजबळांनी पवारांवर केला. बारामतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात भुजबळ बोलत होते.












Click it and Unblock the Notifications