Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बावनकुळेंनी जाहीर माफी मागीतली, तरीही आठवले नाराज... पहा नेमकं काय झालं

महायुती सरकारचा शपथविधी रविवारी झाला. भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र आता याच विषयात मोठी बातमी समोर आली आहे. महायुतीत सहभागी असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला शपथविधीच्या कार्यक्रमाला आमंत्रणच देण्यात आले नव्हते. त्यानंतर उडालेल्या नाराजीनाट्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट रामदार आठवले यांची जाहीर माफी मागितली. मात्र तरीही एका कारणामुळे रामदास आठवले नाराज राहिले.

Ramdas Athavale

बावनकुळे काय म्हणाले?

प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "महायुतीच्या मंत्रिपदाच्या शपथविधीचा कार्यक्रम१४ डिसेंबरला होणार होता. आमचे आमदार आधीच नागपूरला गेले होते. त्यामुळे शपथविधीचं स्थळ अचानक बदललं गेलं. या शपथविधीच्या कार्यक्रमासाठी मी सर्व पक्षांना पत्राच्या माध्यमातून निमंत्रण पाठवलं होतं. मात्र, मी स्वत: जाऊन रामदास आठवले यांना निमंत्रण द्यायला पाहिजे होतं, ते देऊ शकलो नाही. त्याबद्दल मी त्यांची माफी मागतो. रामदास आठवले यांचं आमच्या महायुतीतं मोठं स्थान आहे. त्यांची जी कोणती मागणी असेल त्याबाबत आमचं केंद्रातील नेतृत्व आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे योग्य निर्णय घेतील. आम्ही त्यांचा आदर करतो."

आठवलेची नाराजी कायम

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आठवले म्हणाले, "महायुतीचा एक भाग असूनही शपथविधीचं मला निमंत्रण देखील आलं नाही. मग जेव्हा निवडणुका असतात, तेव्हा मला सगळीकडे नेलं जातं. आता शपथविधीसाठी मला निमंत्रणही मिळालं नाही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली. आमचा समाज मोठ्या संख्यने भाजपाबरोबर राहिला. तरीही लोकसभेच्या निवडणुकीत एकही जागा रिपब्लिकन पार्टीला दिली नव्हती. विधानसभेच्या निवडणुकीतही एकही जागा आम्हाला दिली नाही.

आरपीआयला मंत्रीपदाची अपेक्षा

आठवले म्हणाले, "आम्हाला किमान एक विधानपरिषदेची जागा देण्याचं आश्वासन दिलं होतं. मंत्रिपद देण्याचंही आश्वासन होतं. पण या मंत्रिमंडळात रिपब्लिकन पार्टीचा एकही चेहऱ्याला संधी मिळाली नाही. गेल्यावेळीही आमच्या पक्षाचा एकही मंत्री नव्हता. केंद्रात मला एक मंत्रिपद मिळालं. पण ज्या कार्यकर्त्यांनी मला मंत्रि‍पदापर्यंत पोहोचवलं त्या कार्यकर्त्यांनाही सत्तेत भागेदारी मिळाली पाहिजे. याबाबत मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती. तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की यावेळी संधी दिली जाईल. पण संधी न मिळाल्यामुळे मी नाराज आहे आणि माझे कार्यकर्तेही नाराज आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+