Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

चाळीसगावात निवडणुकीची चुरस वाढणार! भाजपचे मंगेश चव्हाण यांना उन्मेश पाटील यांचे आव्हान

Chalisgaon Assembly Election 2024 : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपच्या पहिल्या जाहीर झालेल्या यादीत मंगेश चव्हाण यांना तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी खासदार उन्मेश पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या दोघांत चुरशीची लढत होणार आहे.

माजी खासदार उन्मेष पाटील यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे चाळीसगावातील राजकारणात मोठा उलथापालथ झाल्याचे दिसून येत आहे. हा मतदारसंघ ठाकरे गटाला सुटला असून उन्मेष पाटील ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. .

Chalisgaon Assembly Election 2024

जीवलग मित्र ते विरोधक

कधीकाळी मंगेश चव्हाण आणि उन्मेष पाटील हे दोघेही जवळचे मित्र होते. मात्र, उन्मेष पाटील यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी शिवसेना 'उबाठा'मध्ये प्रवेश करून मंगेश चव्हाण यांच्याविरुद्धच उभे राहण्याची तयारी केली आहे.

मविआचा उमेदवार कोण?

शिवसेना 'उबाठा'चे उन्मेष पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाबरोबर हातमिळवणी केली आहे. माजी आमदार राजीव देशमुख यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळू शकली नाही, आता त्यांच्यावर उन्मेष पाटील यांना विजयी करण्याची जबाबदारी राहील.

राजीव देशमुख ठरणार किंग मेकर

भाजपकडून मंगेश चव्हाण यांना उमेदवारी मिळाली असली तरी गेल्या पंचवार्षिकला मंगेश चव्हाण अल्पमताधिक्याने निवडून आले आहेत. त्यामुळे यंदा राजीव देखमुख मतदार संघात अधिक जोर लावतील यात शंका नाही, तर शरद पवार गटाकडून प्रमुख दावेदार आहेत. राजीव देशमुख यांचं तालुक्यात एकगठ्ठा मतदान असल्याने ते या निवडणुकीत किंग मेकरच्या भूमिकेत आहेत

भाजपमध्ये अंतर्गत मतभेद

उन्मेष पाटील यांना उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपमधील अंतर्गत मतभेद चव्हाणांच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. या मतभेदांचा परिणाम चव्हाण यांच्या निवडणुकीवर होऊ शकतो. तरीही, गेल्या पाच वर्षांत आमदार चव्हाण यांनी केलेली विकासकामे ही त्यांची जमेची बाजू ठरणार आहे.

Take a Poll

मंगेश चव्हाण यांची कामगिरी आणि आव्हाने

आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव मतदारसंघात गेल्या काही वर्षांत बरीचशी विकासकामे केली आहेत. गावागावांमध्ये रस्ते, पाणीपुरवठा, आणि अन्य पायाभूत सुविधांवर काम केले आहे. त्यामुळे भाजपचे पक्षसंघटन मजबूत झाले आहे. मात्र, चव्हाण यांच्यावर दूध संघातील कथित गैरव्यवहारांचे आरोप आहेत, आणि विरोधक या मुद्याचा वापर प्रचारात करीत आहेत.

Chalisgaon Assembly Election 2024 BJP Mangesh Chavan Vs Shiv Sena UBT Unmesh Patil

समाजांचे मत आणि निवडणूक मुद्दे

चाळीसगावमध्ये बंजारा आणि माळी समाजाची मते निर्णायक ठरणार आहेत. या समाजातील मते कोणत्या दिशेने जातील, यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून असेल.

Chalisgaon Assembly Election 2024

मतदारसंघातील प्रमुख मुद्दे

1. उन्मेष पाटील यांचा शिवसेनेत झालेला प्रवेश : भाजपसोबत असलेल्या जुन्या संबंधांमुळे उन्मेष पाटील यांच्या प्रवेशाने शिवसेनेला मोठा बळ मिळाले आहे.

2. आमदार चव्हाणांवर दूध संघातील कथित गैरव्यवहाराबद्दलचे आरोप : विरोधकांकडून या मुद्द्याचा प्रचंड प्रचार होत आहे.

3. एमआयडीसीमधील अपयश : एमआयडीसीत एकही मोठा उद्योग आणण्यात अपयश आल्याची टीका विरोधक करत आहेत.

4. रस्त्यांची कामे : रस्त्यांच्या कामांची स्तुती केली जात असली तरी काही ठिकाणी नियोजनाचा अभाव असल्याचे दिसून येते.

5. जादा दराने इस्टिमेट : विकासकामांचे इस्टिमेट जादा दराने तयार केल्याचा आरोप चव्हाणांवर आहे, जो त्यांच्या प्रतिमेला धक्का लावू शकतो.

गतवेळी काय झाले होते?

वर्ष 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे मंगेश रमेश चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजीव देशमुख यांचा 4,287 मतांनी पराभव केला होता. त्यावेळेसही हा मतदारसंघ दुरंगी लढतीचे केंद्र होता. मात्र, यावेळी शिवसेना 'उबाठा' आणि भाजप यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+