Anil Deshmukh : अनिल देशमुखांवर सीबीआयकडून गुन्हा , फडणवीसांच्या दबावाला भीक घालत नाही - देशमूख
Anil Deshmukh : राज्यात विधानसभा निवडणुकीआधी जोरदार शाह, काटशाहचं राजकारण सुरु आहे. यादरम्यान, अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांचे द्वंद सुरु असतानाच यांच्यावर आज सीबीआयकडून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गिरीश महाजनांना खोट्या गुन्ह्यात अटकण्याचा आणि अटक करण्याच्या हालचालीसंदर्भातील प्रकरणात अनिल देशमुख यांना आरोपी करण्यात आलं आहे.
सीबीआयने यात अनिल देशमुखांना आरोपी बनवल आहे, याआधी या गुन्ह्यात विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण आणि इतर आरोपी होते. गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप करत त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे हे प्रकरण आहे.

अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा नोंद होताच महाविकास आघाडीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून विद्यमान मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडवण्यात आल्याचा आरोप करत हा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी, गिरीश महाजन यांनीही त्यावेळी पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडली होती. त्यावेळी, त्यांनी थेट अनिल देशमुख यांचे नाव घेत, त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
दरम्यान गुन्हा नोंद होताच अनिल देशमुख यांनी एक ट्विट केले आहे, त्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देत पोस्ट लिहीली असून त्यात त्यांना टोला लगावला आहे.
धन्यवाद...
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) September 4, 2024
देवेंद्रजी फडणवीस
माझ्यावर #CBI कडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल केला गेला आहे. जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान सुरू झाले आहे. या अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही. न झुकता - न डगमगता मी #BJP च्या या दडपशाही…
काय आहे प्रकरण
या सगळ्या प्रकरणात काही दिवसांपूर्वीच गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकार असताना त्यांना मोक्का अंतर्गत अटक करण्यासाठी अनिल देशमुख यांनी खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता असा गंभीर आरोप केला होता. तसेच हा संपूर्ण प्रकार प्रवीण मुंडे यांनीच माझ्या लक्षात आणून दिल्यानंतर मी या संदर्भात अनिल देशमुख यांना जाब विचारला होता असे देखील गिरीश महाजन यांनी म्हटलं होतं. याप्रकरणी नुकतच सीबीआयकडून चौकशी करण्यात आली असून आता अनिल देशमुख यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल देशमुख यांचे ते ट्विट
"धन्यवाद...
देवेंद्रजी फडणवीस
माझ्यावर #CBI कडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल केला गेला आहे. जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान सुरू झाले आहे. या अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही. न झुकता - न डगमगता मी #BJP च्या या दडपशाही विरुद्ध लढण्याची खूनगाठ बांधली आहे.
महाराष्ट्रात फडणवीसांकडून किती खालच्या पातळीचे आणि विकृत मानसिकतेचे घाणेरडे राजकारण सुरू आहे ते जनतेने बघावे. लोकसभा निवडणुकीत या कारस्थानी नेतृत्वाला जनतेने जागा दाखवून दिली आहे, आता महाराष्ट्राची जनता विधानसभा निवडणुकीची वाट बघत आहे !"












Click it and Unblock the Notifications