शरद पवारांचे शिलेदार जितेंद्र आव्हाडांविरोधात संभाजीनगरात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Jitendra Awhad : चुकीची माहिती प्रसारित करून सरकारची बदनामी करणे व शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याबद्दल शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात छत्रपती संभाजीनगरातील वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीबद्दल खोटी माहिती प्रसारित केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय न्याय संहिता 353(2) अंतर्गत जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल गुरुवारी जितेंद्र आव्हाड यांनी शासनाच्या एका जीआरचा चुकीचा संदर्भ देत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाने आता मदत देणे बंद केल्याचा आरोप केला होता.

Jitendra Awhad

नेमकं प्रकरण आहे तरी काय?

राज्याच्या महसूल व वन विभागाने मंगळवारी एक परिपत्रक काढलं होतं, यामध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांच्या मदतीसाठी उणे प्राधिकार पत्रावरील तातडीच्या निधीची मान्यता बंद केल्याचं म्हटलं होतं. राज्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांच्या मदतीसाठीच्या तातडीच्या निधीची मान्यता बंद करण्यात आल्याची माहिती विभागाकडून देण्यात आलेली होती. मात्र काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

सरकारने आरोप फेटाळले

गुरूवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांच्या वारसांच्या मदतीचा निधी बंद करण्यात आलेल्या आदेशाबाबत चर्चा झाली. या बैठकीत लाडकी बहीण योजनेमुळे अन्य कोणत्याही योजना बंद होणार नसल्याचे मंत्रिमंडळाने स्पष्ट केलं आहे. तसेच कुटुंबांना मदत बंद केल्याची माहिती चुकीची असल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले.

आव्हाडांनी काय केला होता आरोप

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी शासनाच्या जीआरसंदर्भात चुकीचा संदर्भ देत खोटी माहिती पसरवली. त्यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून हा जीआर आणि एक पोस्ट शेअर करून राज्य सरकारवर हल्लाबोल चढवला होता. यामध्ये त्यांनी "आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांचा निधी बंद, महसूल व वन विभागाने काढले परिपत्रक'लाडकी बहीण' चा फटका आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना?, शेतकऱ्यांच्या योजनांचे पैसे 'लाडकी बहीण' योजनेला", अशी पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात संभाजीनगरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+