Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, ज्युपिटर रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना?

महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापनेआधी घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे. एकीकडे शपथविधी सुरू असतानाच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे.

त्यांची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी करण्यात आलेली असून या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. परंतु, एकनाथ शिंदे यांना अशक्तपणा आल्याने त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. तर आता शिंदे यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या ठिकाणी शिंदे यांच्या सर्व तपासण्या करण्यात येणार आहेत.

Maharashtra Assembly Election 2024

प्रकृती बरी नसल्याने दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे हे त्यांच्या मुळगावी गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी दोन दिवस आराम केला. त्यानंतर ते ठाण्याच्या निवासस्थानी आले. त्यानंतरही त्यांची प्रकृती पूर्णपणे नव्हती, त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता, त्यानुसार त्यांनी अनेक आमदारांच्या आणि नेत्यांच्या भेटी टाळल्या. त्यानंतर त्यांची डेंग्यू आणि मलेरिया यांची चाचणी केली. मात्र, चाचणी निगेटिव्ह आली आहे, मात्र, पांढऱ्या पेशी कमी जास्त होत असल्याने अजूनही उपचार सुरूच आहेत. आता जुपिटर हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मोठ्या प्रमाणात अशक्तपणा..!

एकनाथ शिंदे यांच्या पांढऱ्या पेशी सातत्याने कमी जास्त होत असल्याने त्यांना अशक्तपणा आलेला आहे. डॉक्टरांनी त्यांना तपासून आरामाचा सल्ला दिलेला आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांची तब्येत अजूनही बरी नसल्याने ते कुठेही बैठकीला जाणार नसल्याचं बोललं जात आहे. आता ते ज्युपिटर रुग्णालयाकडे रवाना झाले आहेत. मात्र, त्यांना अॅडमिट केलं जाणार की घरीच आरामाचा सल्ला देणार हे पाहावे लागणार आहे.

आझाद मैदानात शपथविधीची तयारी

दुसरीकडे 5 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर होऊ घातलेल्या महायुती सरकारच्या शपथविधीची जोरदार तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या दालनामध्ये ही बैठक झाली. बैठकीला पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, प्रोटोकॉल विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+