Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल सी पी राधाकृष्णन , हरिभाऊ बागडेंची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती

मुंबई : झारखंडचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील भाजपाचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मध्यरात्रीनंतर 1 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी या नियुक्त्या केल्याचं पत्रक राष्ट्रपती भवनाकडून जारी करण्यात आलं आहे.

विद्यमान राज्यपाल रमेश बैस यांची मुदत आज म्हणजेच 28 जुलै रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे राज्यात नवीन राज्यपालांची नियुक्ती केली जाईल अशी शक्यता होती. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळामध्ये नियुक्त झालेल्या राज्यपालांना मुदतवाढ देण्यात आली नव्हती.

c p radhakrishnan

कोण आहेत सी. पी. राधाकृष्णन ?

दक्षिण भारतातील भाजपाच्या सर्वात विश्वासू नेत्यांमध्ये सी. पी. राधाकृष्णन यांचा समावेश होतो. सी. पी. राधाकृष्णन हे 67 वर्षांचे आहेत. ते भाजपाचे नेते असून त्यांचा जन्म 4 मे 1957 साली तिरुपूरमध्ये झाला आहे. वयाच्या 16 व्या वर्षापासूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काम करु लागले. त्यांनी जनसंघासाठीही काम केलं.

कोइमतूर मतदारसंघामधून सी. पी. राधाकृष्णन दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी तामिळनाडूचे भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे. 2004 ते 2007 दरम्यान ते तामिळनाडूमध्ये पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. राज्यात पक्षाध्यक्ष असताना काढलेली रथयात्रा चांगलीच प्रसिध्दी मिळाली होती. ही रथयात्रा तब्बल तीन महिने सुरु होती.

नवे राज्यपाल खालीलप्रमाणे

सी. पी. राधाकृष्णन् - महाराष्ट्र
हरिभाऊ किसनराव बागडे - राजस्थान
संतोषकुमार गंगवार - झारखंड
रमण डेका - छत्तीसगड
सी. एच. विजयशंकर - मेघालय
ओमप्रकाश माथूर - सिक्किम
गुलाबचंद कटारिया - पंजाब, चंदीगड
लक्ष्मण प्रसाद आचार्य - आसाम, मणिपूर (अतिरिक्त कार्यभार)
जिष्णू देव वर्मा - तेलंगणा
के. कैलाशनाथन - पुद्दुचेरी (उपराज्यपाल)

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+