Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भीषण अपघाताने बुलढाणा जिल्हा हादरला; कंटेनरला धडक, कारचा चुराडा, 5 जणांवर काळाचा घाला!

Dhule Nagpur Highway Accident news : धुळे-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री झालेल्या एका भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात रणथम गावाजवळ भरधाव इको कार एका कंटेनर ट्रकला मागून धडकल्याने हा दुर्दैवी प्रकार घडला. या घटनेने संपूर्ण बुलढाणा जिल्हा हादरला आहे.

अपघाताचा तपशील

हा अपघात मध्यरात्री रणथम गावशिवारात, एकता हॉटेलजवळ झाला. भुसावळहून मलकापूरकडे निघालेली एक इको कार अतिशय वेगात होती. याच वेळी ती समोरून जाणाऱ्या एका मोठ्या कंटेनर ट्रकला मागून धडकली. धडक इतकी जोरदार होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.

या अपघातात कारमधील चालक आणि तीन महिला प्रवाशांसह एकूण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये चालक साजीद अजीज बागवान (वय 30, रा. भुसावळ) याचा समावेश आहे. इतर तीन महिलांची ओळख अद्याप पटलेली नाही.

Dhule Nagpur Highway

स्थानिक मदत आणि पुढील कार्यवाही

अपघाताचा आवाज ऐकून हॉटेल परिसरातील लोक तात्काळ घटनास्थळी धावले. त्यांनी मदतकार्य सुरू केले आणि पोलिसांना माहिती दिली.

माहिती मिळताच दसरखेड पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमींना उपचारासाठी मल्कापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान एका जणाचा मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनर ट्रक पुढे निघून गेला, त्यामुळे त्याचा शोध सुरू आहे. या भीषण अपघातामुळे महामार्गावरील वाहतूकीचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मालवाहतूक ट्रकने 24 जणांना उडवले!

मुखेड (नांदेड) मधून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग १६१-अ वरील मुखेड शहरातील बाराहाळी चौकात दुपारी ३ च्या सुमारास एका मालवाहतूक ट्रकने अनेक वाहनांना उडवले. या भीषण अपघातात तब्बल २४ नागरिक जखमी झाले असून, त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात अचानक आणि अनपेक्षितपणे झाल्याने मुखेड शहर हादरले आहे. ही घटना बुधवारी (दि. १७) दुपारी घडली होती.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+