डोक्याला खाज तीन दिवसांत पडत आहे टक्कल, बुलढाण्यात विचित्र आजारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
Buldhana Hair Loss News : सध्या देशभरात चीनमधून पसरलेल्या एचएमपीव्ही व्हायरसमुळे लोकांमध्ये चिंता वाढली आहे. प्रशासनाकडून या मार्गदर्शक सुचना ही जाहीर करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात ही काही रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सरकार ही अलर्ट मोडवर आहे. तर दुसरीकडे बुलढाण्यात जिल्ह्यातील काही गावांमध्ये विचित्र आजार पसरत असल्याची माहिती समोर आली आहे.
बुलढाणा जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावांमध्ये एक विचित्र आजार पसरत आहे. गावातील लोकांचे केस फक्त तीन दिवसात वेगाने गळत आहेत. त्यामुळे टक्कल पडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आरोग्य विभागाने बाधित गावांमध्ये सर्वेक्षण सुरू केले असले तरी नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. लोकांच्या मनात प्रश्न आहे की हा नवीन व्हायरस आहे का?

केस गळतीचा विचित्र प्रकार
सर्वात आधी डोक्याला खाज सुटू लागते. त्यानंतर केस सरळ होतात आणि तिसऱ्या दिवशी पूर्ण टक्कल पडते. म्हणजे डोक्यावरून सगळे केस गळून पडत आहेत. अलीकडच्या काळात अनेक महिलांचे केसही गळत असल्याचे स्थानिक लोकांनी सांगितलं आहे. मुले-मुली, वृद्ध महिला आणि पुरुष हे सर्व केस गळणे आणि टक्कल पडण्याचे बळी आहेत. तर गावातील काही लोक केसगळती आणि टक्कलच्या या समस्येपासून वाचण्यासाठी खाजगी रुग्णालयात धाव घेऊन उपचारही घेत आहेत.
या बाधित गावांमध्ये केस गळती आणि टक्कल पडण्याचं कारण दूषित पाणी असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. या गावांतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. शॅम्पूमुळेही असे होऊ शकतं, असं त्वचारोगतज्ज्ञांचं म्हणं आहे. आरोग्य विभागाचे पथक सध्या सर्वेक्षण करुन सल्ला व लक्षणे यांच्या आधारे औषधे देत आहेत.












Click it and Unblock the Notifications