Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

नवी मुंबईत 3 मजली इमारत कोसळली ; 2 नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले, रेस्क्यू ऑपरेशन सुरू

नवी मुंबई : आज पहाटे नवी मुंबईत एक 3 मजल्यांची इमारत कोसळली आहे. पहाटे सर्वजण साखर झोपेत असतानाच अचानक इमारत जमिनदोस्त झाली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 2 जण अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. मात्र या इमारतीत कोणतेही जीवितहानी झाली नसल्याचं अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले आहे.

building collapsed in Navi Mumbai

नवी मुंबईतील बेलापूर येथील शहाबाज गावात सेक्टर 19 येथील हनुमान मंदिर जवळ जी-3 ही बिल्डिंग पडलेली असून या इमारतीमध्ये दोन नागरिक अडकले आहेत. त्यांना काढण्यासाठी घटनास्थळी सीबीडी अग्निशमन दल आणि वॉर्ड ऑफिसमधील कर्मचारी घटनास्थळी पोहोचली आहेत. घटनास्थळी शोध कार्य सुरू आहे.

प्रत्यक्षदर्शी आणि इमारतीतील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास बिल्डिंग कोसळली. पत्त्यासारखी बिल्डिंग जमिनदोस्त झाल्याचं पाहायला मिळालं. बिल्डिंगला अगोदर हादरे बसले, त्यामुळे इमारतीमधील सर्वच नागरिक बाहेर पडले. मात्र, दोन नागरिक यामध्ये अडकल्याची माहिती मिळाली.

घटनेची माहीती मिळताच, पोलीस प्रशासन, अग्निशमन दलाचे जवान, पालिकेचे कर्मचारी, अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सध्या मातीच्या ढिगा-याखाली अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. अजून काही नागरिक ढिगा-याखाली अडकल्याची शक्यता आहे. तरी सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+