मोठी बातमी : मुंबईला जाणाऱ्या 2 आंतरराष्ट्रीय विमानांना बॉम्ब उडवून देण्याची धमकी
मुंबई : मुंबईला जाणाऱ्या दोन आंतरराष्ट्रीय विमानांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. गुरुवारी 17 ऑक्टोबर विस्तारा आणि इंडिगोच्या दोन आंतरराष्ट्रीय विमानांना बॉम्बची धमकी देण्यात आली आहे. याआधी बुधवारी इंडिगो स्पाईसजेटच्या सात फ्लाइटला बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या. दरम्यान मागील चार दिवसांपासून देशांतर्गत विमान कंपन्यांना बॉम्बच्या धमक्या येत आहेत.
यापूर्वी सोमवारी आणि मंगळवारी भारतीय एअरलाइन्सद्वारे चालवल्या जाणाऱ्या डझनभर उड्डाणांना अशाच धमक्या मिळाल्या होत्या. बोईंग 787 विमानाला बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर गुरुवारी 147 जणांसह मुंबईकडे जाणारे विस्तारा विमान फ्रँकफर्टहून तात्काळ सुरक्षा तपासणीसाठी नेण्यात आले.

दरम्यान यावेळी तुर्कीच्या इस्तंबूल येथून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइटलाही बॉम्बची धमकी मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा एजन्सींनी विमान तात्काळ सुरक्षा तपासणीसाठी नेण्यात आले. या संपूर्ण प्रकरणावर एअरलाइनने म्हटलं आहे की "विस्तारा फ्लाइट UK 028, फ्रँकफर्ट ते मुंबई 16 ऑक्टोबर 2024 रोजी उड्डाण करणार होती. सोशल मीडियावर विमानला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली"
एअरलाइन्सने दिलेल्या माहीतीनुसार सर्व संबंधित अधिकाऱ्यांना प्रोटोकॉलनुसार ताबडतोब कळविण्यात आले होते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आलं.सर्व प्रवाशी सुरक्षित उतरवण्यात आल्यानंतर सुरक्षा तपासणी पूर्ण करण्यासाठी आम्ही सुरक्षा यंत्रणांना पूर्ण सहकार्य करत आहोत,असं विस्ताराने निवेदनात म्हटलं आहे.












Click it and Unblock the Notifications