Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बाप रे ! तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये ब्लेड व खडे; खरी कहाणी समजल्यावर पोलिसही चक्रावले

मुंबईतल्या केईएम हाँस्पिटलमध्ये एक वेगळीच केस दाखल झाली. एका वीस वर्षीय तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये डाँक्टरांना सर्जरी ब्लेड व काही खडे सापडले. पोलिसांनी या प्रकाराबाबत तपास केल्यानंतर मात्र एक धक्कादायक घटना समोर आली. विशेष म्हणजे प्रायव्हेट पार्टमध्ये या वस्तू कशा गेल्या, याबाबत या तरुणीनेच पोलिसांची दिशाभूल केली. मात्र त्यानंतर पोलिसांनी एकेक पदर उलगडवत प्रकरणाचा तपास लावलाच.

rape a young woman

नेमकं काय झालं?

मुंबईतील गोरेगाव परिसरात वनराई पोलिसांना एक जखमी वीस वर्षीत तरुणी भेटली. तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सर्जिकल ब्लेड व खडे आढळल्याने तिला पोलिसांनी तत्काळ केईएम रुग्णालयात दाखल केले. डाँक्टरांनी तिच्यावर उपचार केल्यानंतर पोलिसांनी त्या तरुणीची चौकशी केली. त्यानंतर ती तरुणी अनाथ असून वाराणसीतील एका काकांनी तिचा सांभाळ केल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी मुंबईला कधी व कशी आली याचा शोध घेतला असता तिने आपल्या काकांसोबतच २० जानेवारीला आपण मुंबईत आल्याचं सांगितलं.

पोलिसही चक्रावले

त्यानंतर पोलिसांनी काका, वाराणसी या पद्धतीने शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या तरुणीच्या जबाबात पोलिसांना शंका आली. डाँक्टरांनीही प्रायव्हेट पार्टमध्ये सापडलेल्या वस्तूंबाबत शंका घेतली. पोलिसांनी नंतर त्यांच्या पद्धतीने तपास केल्यावर अनेक धक्कादायक पदर उलगडत गेले. ही तरुणी वाराणसीची नसून मुंबईतीलच आहे, हे तपासात उघड झाले. शिवाय काका वगैरे कुणी नसून तिचे आईवडील नालासोपारा येथे राहतात, असंही पोलिसांना समजलं. तरुणीने केलेला बनाव पोलिसांना उघड केला. त्यानंतर पोलिसांनी तिला बोलतं केलं. तीने जे सांगितलं ते ऐकूण मात्र पोलिसांनाही धक्का बसला.

कोण होती तरुणी?

ही तरुणी नालासोपारा येथील असून तिचे वडील फळविक्रीची हातगाडी चालवतात. आई परिसरात घरकाम करते. वडिलांचा स्वभाव रागीट असून कुटुंबात नेहमी कलह सुरु असतो. या कलहाला कंटाळून ही तरुणी २१ जानेवारीला नालासोपारा स्टेशनला गेली. तेथे तिला राजरतन सदाशिव वायवळ (वय ३२) हा रिक्षाचालक भेटला. या तरुणीने त्याला घरची कहाणी सांगितली. राजरतनने तरुणीची गरज ओळखून तिला भुलवले. राजरतन तिला घेऊन अर्नाळा येथे गेला. तेथे तिच्यावर दोन वेळा अत्याचार केला. त्यानंतर तो तरुणीला घेऊन पुन्हा नालासोपाऱ्यात आला.

कसा केला बनाव?

हे सगळं झाल्यावर नालासोपाऱ्यात आल्यावर तरुणीला भिती वाटू लागली. घरी गेलं आणि आपल्या आईवडिलांना हे समजलं तर आपल्याला ते जिवंत ठेवणार नाहीत, असं समजून तिने एक प्लॅन केला. त्यानंतर तिने आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये सर्जिकल ब्लेड व खडे टाकले. मात्र ते टाकल्यानंतर तिला जास्त त्रास होऊ लागल्याने ती पोलिसांच्या हाती सापडली. पोलिसांनी अवघ्या काही तासांत तिचा बनाव उघड केला व राजरतन या रिक्षाचालकाला अटक केली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+