चक्रव्युव्ह देवाभाऊ भेदणार! भाजपचं नवं गाणं, नागपुरात फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन, उमेदवारी अर्ज दाखल
BJP's New Song Launched Criticizes on Sharad Pawar UBT : भाजपचे ज्येष्ठ नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. तत्पुर्वी त्यांनी रॅली काढून मोठे शक्तिप्रदर्शन केले. फडणवीस हे नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
भाजपचे नवीन गाणे लाँच झाले असून यातून युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली आहे. चक्रव्युव्ह देवाभाऊ भेदणार हे भाजपचं नवं गाणं लाँच झालं असून नव्या गाण्यातून भाजपने महाविकास आघाडीवर टीका केली आहे. या गाण्यातून देवेंद्र फडणवीसांचा आधुनिक अभिमन्यू म्हणून उल्लेख करण्यात आला आहे तर उद्धव ठाकरे, शरद पवारांना दुर्योधनाची उपमा देण्यात आली आहे.

सुनील केदार, नाना पटोलेंवर टीका
उमेदवारी अर्ज दाखल करताना देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही विकास करत आहोत. विरोधकांना आमच्या लाडक्या बहिणीच पुरेशा आहेत. ज्या लाडक्या बहिणींच्या तोंडचा घास काँग्रेसच्या नेत्यांनी पळवला. यात सुनील केदार, नाना पटोले यांनी कोर्टात याचिका टाकली.

फडणवीसांची ही सहावी निवडणूक
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांची रॅली निघाली. या रॅलीत मोठ्या संख्येने कार्यकर्तेही होते.

दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून ते आपला उमेदवारी अर्ज सादर करत आहेत. तत्पूर्वी सकाळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. ही आपली सहावी निवडणूक असून ज्याप्रमाणे जनतेने आणि माझ्या कुटुंबीयांनी मला पाठिंबा दिला त्याचप्रमाणे यावर्षी देखील मी प्रचंड बहुमताने विजय होईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, आमचं काम बोलतं. नागपूर शहर आम्ही बदलून टाकलं. विरोधकांच्या सत्ता काळातील त्यांनी जीआर दाखवावे, ओबीसी समाजासाठी आम्ही 48 जीआर काढले, हेही फडणवीस म्हणाले.
यंदा फडणवीस जिंकले तर कितवा विजय असेल?
- संविधान चौकात येऊन देवेंद्र फडणवीस यांच्या रॅलीला प्रारंभ झाला. यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज नागपूर तहसिल कार्यालयात सादर केला आहे.
- देवेंद्र फडणवीस हे यापूर्वी दोन वेळा पश्चिम नागपूरमधून निवडून आले आहेत.
- तर त्यानंतर नव्याने तयार झालेल्या दक्षिण-पश्चिम नागपूरमधून तीन वेळा निवडून आले आहेत.
- सलग 5 वेळा निवडून आलेले देवेंद्र फडणवीस यांची ही सहावी विधानसभा निवडणूक आहे.
- 1999 पासून त्यांच्या आमदार म्हणून कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाले आहेत.












Click it and Unblock the Notifications