BJPची घराणेशाही! 99 पैकी राजकीय पार्श्वभुमी असलेले कोण-कोण? या उमेदवारांना तिकीट,वाचा स्पेशल रिपोर्ट
BJP's nepotism out of 99 tickets to candidates from Political backgrounds : भाजप काँग्रेस आणि काही पक्षांत घराणेशाही असल्याची टीका करत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काँग्रेसवर घराणेशाहीचा ठपका ठेवला आहे. पण काल-परवा भाजपने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी जी यादी जाहीर केली. त्या यादीतही घराणेशाहीतून आलेले उमेदवार दिसून आले आहेत. आधी राजकारणात असलेल्या नेत्यांच्या मुला-मुलींना भाजपने उमेदवारी दिली आहे.
भाजप इतर पक्षांवर घराणेशाहीचे आरोप करत असतानाच त्यांच्याच पक्षात अशा पद्धतीने उमेदवारी दिली गेली आहे. घराणेशाहीच्या राजकारणाचे पालन-पोषण सर्वच पक्ष करत आहेत. मात्तब्बर नेत्यांच्या मुलांवर राजकीय पक्षांची 'माया' जडली आहे, भाजप असो की, इतर काही पक्ष घराणेशाहीतून त्यांनी उमेदवार दिले हे जाहीर झालेल्या यादीतून दिसत असल्याची उदाहरणे समोर आली आहे.

99 पैकी घराणेशाहीतून आलेले, राजकीय पार्श्वभुमी असलेले उमेदवार
- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस हे नागपूरहून 'एमएलसी'तर काकू शोभा फडणवीस शिवसेना-भाजप सरकारमध्ये मंत्री होत्या.
- अशोक चव्हाण खुद्द काँग्रेस व नंतर भाजपमध्ये आहेत, त्यांची मुलगी श्रीजया चव्हाण, या भोकरच्या जागेवर भाजपकडून लढणार आहेत. मतदारयादीत त्यांचे नाव आहे.
- आशिष शेलार शेलार यांना तिकीट मिळाले, त्यांच्या सख्ख्या भावालाही तिकिट मिळाले. म्हणजे एकाच कुटुंबात 2 उमेदवार.
- हरिभाऊ जावळेचे सुपूत्र अमोल जावळे यांनाही तिकीट मिळाले.
- लक्ष्मण जगताप यांच्या परिवारातील शंकर जगताप यांना तिकीट मिळाले.
- बबनराव पाचपुते यांची पत्नी प्रतिभा पाचपुते यांना तिकीट मिळाले.
- धनंजय महाडिक यांचे छोटे भाऊ अमल महाडीक यांना तिकीट दिले गेले.
- जिंतूर मतदारसंघातून रामप्रसाद बोर्डीकर यांची मुलगी मेघना बोर्डीकर यांना तिकीट दिले आहे.
- रावसाहेब दानवे यांचा मुलगा संतोष दानवे यांनाही तिकीट मिळाले आहे.
- माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे नातू संभाजीराव पाटील निलंगेकर यांना तिकीट दिले गेले.
- अनिल शिरोळे यांचे सुपूत्र सिद्धार्थ शिरोळे यांना तिकीट दिले गेले.
- तुळजापूर - पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील.
- कणकवली - नारायण राणे यांचे पूत्र नितेश राणे.












Click it and Unblock the Notifications