Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भाजपला मराठवाड्यात बसणार मोठा धक्का! एक माजी खासदार आणि दोन माजी आमदार कॉंग्रेसच्या वाटेवर

BJP will face big blow in Marathwada :राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. यात नांदेड जिल्ह्यातील राजकारण सध्या चर्चेचा विषय बनले आहे. ज्येष्ठ भाजप नेते आणि माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, त्यांच्या दोन समर्थक माजी आमदारांसह कॉंग्रेसच्या वाटेवर आहेत.‌ लवकरच त्यांचा भव्य प्रवेश सोहळा होणार आहे.

ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी ही घडामोड घडणार असल्याने हा अशोक चव्हाण आणि भाजपला मोठा धक्का असणार आहे. खतगावकर यांच्या सोबतत्यांच्या स्नुषा डॉ. मीनल पाटील याही भाजपचे सदस्यत्व सोडणार आहेत.

BJP will face big blow in Marathwada

लोकसभेची पोटनिवडणूक

खासदार वसंत चव्हाण यांच्या दुर्दैवी निधनानंतर नांदेड लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीसोबतच येथे लोकसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. भाजपकडून माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारीचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. दुसरीकडे, कॉंग्रेसकडून खतगावकर यांचा उमेदवारीसाठी विचार होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे.

भाजप नेते अशोक चव्हाण यांनी डॉ. मीनल पाटील यांना भाजपकडून लोकसभेची पोटनिवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, चिखलीकर स्पर्धेत असल्याने खतगावकर यांनी तो प्रस्ताव जवळपास नाकारला. आता आपल्या दोन माजी आमदार समर्थकांसह खतगावकर कॉंग्रेसच्या वाटेवर आहेत.

खतगावकरांचा राजकीय प्रवास

खतगावकर हे नांदेड जिल्ह्यातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची राजकीय भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या बहीण स्नेहलता यांचे खतगावकर हे पती आहेत. कॉंग्रेसमधून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली होती.‌ते वेळा आमदार आणि तीन वेळा खासदार राहिले. राज्यात ते मंत्रीही होते. आता खतगावकर आणि त्यांच्या स्नुषा डॉ. मीनल पाटील तसेच अन्य दोन माजी आमदार कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत आहेत. गणेशोत्सवानंतर हा प्रवेश अधिकृत होऊ शकतो.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राज्याध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अमित देशमुख यांसारख्या वरिष्ठ नेत्यांनी खतगावकर यांच्याशी संपर्क साधला आहे. मुंबईत पक्षात प्रवेश करण्याऐवजी नांदेडमध्येच एक भव्य सोहळा आयोजित करण्याचा विचार सुरू आहे.

विधानसभा निवडणूक आणि संभाव्य उमेदवार

खतगावकर यांची स्नुषा डॉ. मीनल पाटील यांची नायगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीची शक्यता आहे. काँग्रेसने वसंतराव चव्हाण यांचे पुत्र प्रा. रवींद्र चव्हाण यांना नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्याचा विचार केला आहे. अशा स्थितीत कॉंग्रेस दोघांनाही उमेदवारी देऊन त्यांचे समाधान करू शकते.

नांदेड लोकसभा निवडणुकीचे महत्त्व

गेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेड हा मतदारसंघ चर्चेचा केंद्रबिंदू ठरला होता. काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण आणि भाजपचे प्रताप चिखलीकर यांच्यात थेट लढत झाली होती. मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनामुळे निवडणुकीतील गणिते बदलली होती. मात्र, वसंत चव्हाण 59 हजार 442 मतांनी विजयी झाले होते.

भविष्यातील राजकीय चित्र

खतगावकरांचा कॉंग्रेस प्रवेश झाल्यास नांदेड जिल्ह्यात मोठे राजकीय परिवर्तन होण्याची शक्यता आहे. भाजपमधून बाहेर पडून काँग्रेसमध्ये जाणे हा त्यांच्या राजकीय प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असेल. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका या दृष्टीने या हालचालींमुळे जिल्ह्यातील राजकारणाचे चित्र अधिकच रंगतदार होईल.(BJP will face big blow in Marathwada)

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+