Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मुंडे परिवाराला बळ, पंकजाताईना राज्यसभेवर संधी?

मुंबई: बीड लोकसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना भाजपकडून राज्यसभेवर संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. भाजपच्या गोटात तशा हालचाली सुरु असल्याची माहिती आहे.

pankaja munde

दिल्लीत केंद्रीय नेतृत्वाने नुकतीच महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक घेतली होती. या बैठकीत पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि उदयनराजे भोसले हे लोकसभेवर निवडून आल्याने त्यांच्या राज्यसभेतील जागा रिक्त झाल्या आहेत. यापैकी एका जागेवर पंकजा मुंडे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे यांच्या निसटत्या पराभवामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये कमालीचे नैराश्य आले आहे.

पंकजा मुंडेंना राज्यसभेवर घेऊन त्यांच राजकीय पुनर्वसन केल्यास राज्यातील मुंडे समर्थकांना मोठा दिलासा मिळू शकतो. राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरु आहे. ओबीसी नेत्या असलेल्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घ्या, असा एक गट भाजपच्या राज्यातील नेत्यांमध्ये आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत राज्यातील भाजप नेत्यांनी त्यांना राज्यसभेवर घेण्याची मागणी केंद्रीय नेतृत्वाकडे केल्याची माहिती आहे. तसेच राज्यात अनेक ठिकाणी ओबीसी बांधवांनी बॅनर लावत पंकजा मुंडेंना राज्यसभेवर घेऊन केंद्रात मंत्रीपद देण्याची मागणीही काही दिवसांपूर्वी केली आहे.

राज्याच्या राजकारणात बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सर्वाधिक चर्चेत राहिली होती. बीडमध्ये महायुतीच्या पंकजा मुंडे विरुद्ध शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्यात शेवटच्या फेरीपर्यंत अत्यंत चुरशीचा सामना पाहायला मिळाला होता. या लढतीचा निकाल सर्वात शेवटी लागला. त्यामध्ये पंकजा मुंडे यांना 6 लाख 77 हजार 397 मतं मिळाली तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बजरंग सोनावणेंना 6 लाख 83 हजार 950 मतं मिळाली. फक्त 6 हजार 553 मतांनी बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला. हा पराभव पंकजा मुंडे समर्थकाच्या जिव्हारी लागला. पंकजाताईंचा पराभव झाल्याने अनेकांना अश्रू अनावर झाले तर, बीड जिल्ह्यात या पराभवाचे पडसादही पाहायला मिळाले.

मराठवाड्यात पंकजा मुंडे समर्थकांच्या आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुकीत झालेला निसटता पराभव पंकजा मुंडे यांच्या समर्थकांना प्रचंड जिव्हारी लागला. त्यांचे समर्थक कमालीचे निराश झाले होते. याच नैराश्याच्या भरात बीड जिल्ह्यातील 3 आणि लातूर जिल्हातील एका मुंडे समर्थक तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. पंकजा मुंडे यांनी या सगळ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते. तसेच आपल्या समर्थकांना आत्महत्या करु नका, असे आवाहन केले होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+