'प्रभू श्रीरामांच्या स्वागतासारखा अनुभव' - ऐश्वर्या पठारे; प्रतिसादाने भाजप उमेदवार भारावले
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. सर्वच प्रभागांमध्ये चुरस पाहायला मिळत असताना, प्रभाग ३ मध्ये मात्र भाजपच्या पॅनेलने प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे, केवळ पारंपरिक प्रचार न करता 'कॉर्पोरेट' पद्धतीने मांडलेली विकासाची ब्लू-प्रिंट आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा प्रभाग सध्या केंद्रस्थानी आला आहे.

घरोघरी उमेदवारांचे जल्लोषात स्वागत
प्रभाग ३ मधील भाजपच्या अधिकृत उमेदवार ऐश्वर्या पठारे, रामदास (रामभाऊ) दत्तात्रय दाभाडे, अनिल दिलीप सातव आणि श्रेयस प्रितम खांदवे यांच्या पॅनेलने सध्या जनसंपर्कावर भर दिला आहे. प्रचारादरम्यान अनेक ठिकाणी नागरिक स्वतःहून घराबाहेर येऊन उमेदवारांचे स्वागत करत आहेत. दारापुढे काढलेल्या रांगोळ्या, फटाक्यांची आतिशबाजी आणि फुलांचा वर्षाव यामुळे प्रचाराला एखाद्या उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
'रामराज्या'च्या स्वागताची भावना
प्रचारादरम्यान मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल बोलताना उमेदवार ऐश्वर्या पठारे भावूक झाल्या. त्या म्हणाल्या, "नागरिकांकडून मिळणारे प्रेम पाहून आम्ही भारावून गेलो आहोत. प्रभू श्रीराम अयोध्येत परतल्यावर जसे स्वागत झाले होते, अगदी तसेच स्वागत इथली जनता आमचे करत आहे. हा अनुभव एखाद्या सणापेक्षा कमी नाही."
रामभाऊ दाभाडे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात केलेल्या जनसेवेची पावतीच लोकांच्या या प्रेमातून मिळत असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
विमाननगरमध्ये 'कॉर्पोरेट' स्टाईल प्रेझेंटेशन
या निवडणुकीत ऐश्वर्या पठारे यांच्या प्रचार पद्धतीची विशेष चर्चा होत आहे. विमाननगर परिसरात नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी केवळ आश्वासने न देता, चक्क 'कॉर्पोरेट स्टाईल'ने प्रेझेंटेशन दिले. प्रभागाचा विकास कसा करणार, रखडलेले प्रश्न कसे सोडवणार आणि भविष्यातील कामांचे नियोजन काय असेल, याची 'ब्लू-प्रिंट' त्यांनी मतदारांसमोर मांडली. सुशिक्षित आणि नोकरदार वर्गाकडून या पारदर्शक पद्धतीचे मोठे कौतुक होत आहे.
पॅनेलची महत्वाची वैशिष्ट्ये
- अनुभवी, तरुण आणि अभ्यासू चेहरे
- नियोजनबद्ध प्रचार: सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष भेटीगाठींचे अचूक गणित.
- स्थानिक प्रश्न: रस्ते, पाणी आणि नागरी सुविधांवर आधारित 'ब्लू-प्रिंट'वर भर.
निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली असून, येत्या १५ तारखेला मतदान होणार आहे. प्रभाग ३ मधील हा प्रचाराचा वेग मतदानापर्यंत किती टिकून राहतो आणि मतदारांचा हा उत्साह मतपेटीतून कसा उमटतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












Click it and Unblock the Notifications