Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कोकण पदवीधरसाठी महायुतीने कंबर कसली

मुंबई: कोकण पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीने कंबर कसली असून उमेदवार निरंजन डावखरे यांच्या विजयासाठी महायुती एकदिलाने रिंगणात उतरल्याचे दिसून येत आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे आणि रिपाई यांचे नेते आणि पदाधिकारी यांच्या ऐक्याचे दर्शन नुकतेच ठाण्यात झाले.

BJP Vijay Sankalp Melava

महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारार्थ आज विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन ठाण्यातील टीप टॉप प्लाझा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

सर्वपक्षीय दिग्गजांची उपस्थिती

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप ज्येष्ठ नेते आणि आमदार गणेश नाईक, मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार नरेश म्हस्के, खासदार डॉ.हेमंत सावरा, माजी खासदार कपिल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमोद हिंदुराव, आमदार मंदा म्हात्रे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, आमदार संदीप नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार कुमार आयलानी, आमदार गीता जैन, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, माधवी नाईक, गोपाळ लांडगे, मनसेचे अविनाश जाधव, अभिजित पानसे, राजेंद्र गावित, आनंद परांजपे, जयप्रकाश ठाकूर, भास्कर वाघमारे, संजय वाघुले आणि महायुतीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.

महायुतीचाच उमेदवार विजयी होणार : शिंदे

कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीचाच उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. राज्य शासनाच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात अनेक निर्णय घेण्यात आले असून त्याचा समाजातील सर्व घटकांना न्याय मिळाला आहे, अशी भावना शिंदे यांनी व्यक्त केली. निरंजन डावखरे गेल्या बारा वर्षांपासून कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार म्हणून कार्यरत आहेत. या निवडणुकीत दिले जाणारे प्रत्येक मत महत्वाचे असून ते मत महायुतीच्याच उमेदवाराला पडेल यासाठी सजग राहून काम करावे असे आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.

२००५ आधीच्या शिक्षकांना न्याय देणार

राज्यातील शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा अत्यंत अवघड काम आपण करून दाखवले आहे. २००५ आधीच्या शिक्षकांना न्याय देण्याचा देखील नक्की प्रयत्न करू, निरंजन डावखरे यांनी केलेली कामे आणि विविध विषयांचा केलेला पाठपुरावा पाहता त्यांनी कायम सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून आपल्याला त्यांना निवडून आणायचे आहे. येणारा काळ हा महायुतीचा असून त्यासाठी आपली वज्रमूठ या निवडणुकीपासूनच घट्ट करण्याचे आवाहन यासमयी एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केले. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरे आणि कॉंग्रेसचे रमेश कीर यांच्यात लढत होत आहेत. मनसेचे अभिजित पानसे यांनी या लढतीतून माघार घेतली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+