Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महायुतीच्या 90 टक्के जागा ठरल्या, बावनकुळेंचं पुण्यात मोठं विधान...

Maharashtra Assembly Election 2024 : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे गुरुवारपासून पुण्यात आहेत. काल आणि आज असे दोन्ही दिवस त्यांनी मतदारसंघाचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. महायुतीमध्ये 90% जागांवर एकमत झाले आहे. केवळ दहा टक्के जागांवर एकमत होणे बाकी आहे. ते देखील लवकरच होईल, असा दावा त्यांनी केला. महाविकास आघाडीवरही त्यांनी निशाणा साधला. त्यांचे सरकार निवडून आले तर, महाराष्ट्राचे वाटोळे होईल, अशी टिका त्यांनी केली.

जगदीश मुळीकांनी घेतली भेट

वडगाव शेरी मतदारसंघातून भाजपचे जगदीश मुळीक हे इच्छुक उमेदवार आहेत. त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. कालदेखील त्यांनी बावनकुळे यांची उमेदवारी संदर्भात भेट घेतली होती. यावर इच्छुक उमेदवारांना भेटणे हे प्रदेशाध्यक्ष म्हणून माझे काम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. उमेदवारी मागणे किंवा भेट घेणे हा त्यांचा अधिकार आहे, असं बावनकुळेंनी स्पष्ट केलं.

Chandrashekhar Bawankule

उमेदवारी देताना क्षमतेचा विचार

भारतीय जनता पक्षाच उमेदवार हा जातीवर नाही तर क्षमतेवर ठरत असतो. मतदारसंघातील जनतेचे मत काय आहे? तेथील कार्यकर्त्यांचे मत काय आहे? यावर बरेच काही अवलंबून असते, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. उमेदवाराच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय बोर्ड निर्णय घेतो. त्यामुळे त्याबाबत मी बोलणे योग्य होणार नसल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

दोघे इच्छुक असतील, तर त्याला बंडखोरी म्हणत नाहीत

एखाद्या मतदारसंघातून दोन उमेदवार इच्छुक असतील, दोघांनीही उमेदवारी मागितली, तर त्याला बंडखोरी म्हणत नाहीत. पक्षाने अधिकृत उमेदवारी दिल्यानंतरही कोणी विधानसभा निवडणूक लढवत असेल, तरच त्याला बंडखोरी म्हटले जाते. त्यामुळे एका मतदारसंघात जास्त इच्छुक असणे, ही बंडखोरी होत नसल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. त्यामुळे कोणाचीही समजूत काढण्याची आवश्यकता नाही. पक्षाकडून कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय पक्षातील वरिष्ठ नेते घेत असतात. असे देखील बावनकुळे यांनी म्हटले आहे.

आज जाहीर होणार पहिली यादी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच महायुतीतील जागावाटपाची चर्चा अद्यापही सुरू आहे. या जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी महायुतीतील तीन प्रमुख नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्लीत अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्यातच भाजपच्या पहिल्या यादीची शक्यता देखील आज वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आता या सर्व घडामोडींकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+