Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पण अर्धवटराव ठाकरेंना या परिस्थितीतही विनोदबुद्धी सुचते, बावनकुळेंची उध्दव ठाकरेंवर जोरदार टीका

मुंबई : बांगलादेशामधील सत्तापरिवर्तन आणि त्यानंतर हिंदू, बौद्ध आणि तिथल्या अल्पसंख्यांक समुदायाविरोधात सुरू असलेली हिंसा हा अत्यंत गंभीर विषय आहे.पण अर्धवटराव ठाकरे यांना या परिस्थितीतही विनोदबुद्धी सुचते. मला त्यांच्या बुध्दीची कीव करावी वाटते असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उध्दव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

बांगलादेशातील भयंकर, भयानक स्थिती लक्षात न घेता अतिशय बालिश विधाने करून ते मोदींजींची नाही तर हिंसेचे बळी ठरलेल्या हिंदू , बौद्ध आणि इतर समाज बांधवांची थट्टा करत आहेत. हिंदू विरोधी विचारांच्या, दहशतवादी कृत्य करणाऱ्या लोकांना सल्ला देण्यासाठी उद्धव ठाकरे हे अतिशय उत्कृष्ठ सल्लागार आहेत. हल्ली त्यांचा सल्ला हे सगळेच ऐकतात. म्हणून त्यांनी बांगलादेशाचा दौरा करावा असा सल्ला ही बावनकुळे यांनी दिला आहे.

Chandrashekhar Bawankule

काय म्हणाले आहेत बावनकुळे ?

बांगलादेशामधील सत्तापरिवर्तन आणि त्यानंतर हिंदू, बौद्ध आणि तिथल्या अल्पसंख्यांक समुदायाविरोधात सुरू असलेली हिंसा हा अत्यंत गंभीर विषय आहे. केंद्र सरकार यावर पहिल्या दिवसापासून गांभीर्याने व्यक्त होत आहे. पण अर्धवटराव ठाकरे यांना या परिस्थितीतही विनोदबुद्धी सुचते. मला त्यांच्या बुध्दीची कीव करावी वाटते. त्यांच्या देशभक्तीबद्दल प्रश्न निर्माण होतात.

बांगलादेशातील भयंकर, भयानक स्थिती लक्षात न घेता अतिशय बालिश विधाने करून ते आदरणीय मोदींजींची नाही तर हिंसेचे बळी ठरलेल्या हिंदू , बौद्ध आणि इतर समाज बांधवांची थट्टा करत आहेत. ज्यांना याही परिस्थितीत राजकारण सुचते त्यांच्या बौद्धिक क्षमतेवरच प्रश्नचिन्ह लावावे लागेल. काँग्रेसच्या दारात लोटांगण घालून घालून उद्धव ठाकरेंचा बौद्धिक विकास खुंटला असावा.

सत्तेसाठी लाचार होऊन त्यांनी याआधीच हिंदुत्वाला तिलांजली दिलीय , आज ते पीडित हिंदूंची थट्टा करीत आहेत.हिंदू विरोधी विचारांच्या, दहशतवादी कृत्य करणाऱ्या लोकांना सल्ला देण्यासाठी उद्धव ठाकरे हे अतिशय उत्कृष्ठ सल्लागार आहेत. हल्ली त्यांचा सल्ला हे सगळेच ऐकतात. म्हणून त्यांनी बांगलादेशाचा दौरा करावा. फेसबुक लाईव्ह करावे. बांगलादेशात प्रबोधन करावे.

हिंदूंवर अत्याचार होणार नाहीत. हिंदूंच्या हत्या, लूटमार, महिलांवर अनन्वित अत्याचार, मंदिरांवर हल्ले होणार नाहीत, यासाठी पुढाकार घ्यावा. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या शेहजाद्याला दिल्लीत जरूर लोटांगण घालावे, आंतरराष्ट्रीय प्रश्नावर आपले अघाध ज्ञान (?) पाजळू नये, असा सल्ला ही चंद्रशेखर बावनकुळे यांनी उध्दव ठाकरे यांनी दिला आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+