Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

18 केसेस, नोकरीवर पाणी..तरीही डावलले! संभाजीनगर BJPमध्ये भडका;सावेंच्या ऑफिससमोर हायव्होल्टेज ड्रामा

BJP Rebellion in Sambhajinagar : नाशिकपाठोपाठ आता छत्रपती संभाजीनगरमध्येही भारतीय जनता पक्षातील अंतर्गत असंतोषाचा ज्वालामुखी फाटला आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी तिकीट वाटप जाहीर होताच निष्ठावंतांनी थेट बंडाचे निशाण फडकवले आहे.

"पक्षासाठी १८ वर्षे रक्त आटवले, अंगावर केसेस घेतल्या, नोकरी सोडली, पण फळ मात्र नवख्यांना मिळाले," असा टाहो फोडत कार्यकर्त्यांनी मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयासमोर जोरदार धिंगाणा घातला. या परिस्थितीमुळे भाजपमधील गटबाजी आणि नाराजी आता चव्हाट्यावर आली आहे.

BJP Rebellion in Sambhajinagar

18 वर्षांची निष्ठा अन 18 गुन्हे; दिव्या मराठेंना अश्रू अनावर

प्रभाग क्रमांक २० मधून 'खुल्या प्रवर्ग महिला' गटातून उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असलेल्या दिव्या उल्हास मराठे यांना पक्षाने डावलल्याने त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. मंत्री अतुल सावे आणि खासदार भागवत कराड यांना जाब विचारताना त्यांना अश्रू अनावर झाले.

"ज्यावेळी पक्षात कोणी नव्हते, तेव्हा आम्ही भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. पक्षाच्या आंदोलनांसाठी माझ्यावर आज १८ केसेस आहेत. पण आज सत्तेची फळे चाखण्याची वेळ आली तेव्हा पक्षाचे काम कधीही न करणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीला उमेदवारी दिली गेली. हा निष्ठावंतांचा अपमान नाही का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

'नेत्यांच्या सर्व्हेचा खेळ' आणि कार्यकर्त्यांचा संताप

पक्षाने उमेदवारी नाकारताना 'वरून नाव आले नाही' किंवा 'सर्व्हेत नाव नाही' अशी कारणे दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये अधिकच संताप निर्माण झाला आहे.

"वर बसलेल्या नेत्यांना गल्लीतील कार्यकर्त्याच्या पत्नीची ओळख कशी असू शकते?" असा सवाल करत दिव्या मराठे यांनी भाजपच्या अंतर्गत निवड प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. २०१५ मध्येही आपल्यावर असाच अन्याय झाला होता, अशी आठवण त्यांनी यावेळी करून दिली.

सावेंच्या कार्यालयासमोर पोलिसांचा फौजफाटा

केवळ दिव्या मराठेच नव्हे, तर पक्षासाठी स्वतःची नोकरी सोडलेल्या एका अन्य इच्छुक उमेदवारानेही मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयासमोर संताप व्यक्त केला.

कार्यालयाबाहेर जमलेल्या गर्दीने आणि वाढत्या तणावामुळे अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले. "आम्ही खस्ता खाल्ल्या आणि ऐनवेळी उपऱ्यांना संधी का?" असा संतप्त सवाल कार्यकर्त्यांनी स्थानिक नेतृत्वाला विचारला आहे.

बंडाचे निशाण आणि उपोषणाचा इशारा

आपल्याला न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका दिव्या मराठे यांनी घेतली आहे. त्यांनी आता थेट उपोषणाचा पवित्रा घेतला असून, या बंडाचा फटका निवडणुकीत बसण्याची दाट शक्यता आहे. निष्ठावंतांना डावलून 'घराणेशाही' किंवा 'सोयीचे राजकारण' केल्याचा आरोप आता भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर होत आहे.

पक्षात मोठी फूट पडणार?

उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झालेल्या या राड्यामुळे भाजपची शिस्त आणि एकजूट धोक्यात आली आहे. जर या नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात आली नाही, तर संभाजीनगर महापालिकेत भाजपला आपल्याच बंडखोरांचा सामना करावा लागू शकतो.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+