'राज ठाकरेंमध्ये दम असेल तर बिहार, युपीत यावं, मग आपटू आपटू मारू'; BJP खासदाराचे खुले आव्हान!
BJP MP attacks Raj Thackeray and Uddhav Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) प्रमुख राज ठाकरे यांच्या 'त्यांना (हिंदी भाषिक) मारहाण करा, पण व्हिडिओ बनवू नका' या वादग्रस्त विधानावर झारखंडचे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी संताप व्यक्त केला. तर त्यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल चढवला.
भाजप खासदार निशिकांत दुबे म्हणाले की, मुंबई मनपाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) राजकारण करत आहे. पण, माझे राज ठाकरेंना खुले आव्हान आहे. तुमच्या घरात बसून काय बोलताय, जर तुमच्यात हिंमत, दम असेल तर बिहार, उत्तर प्रदेश किंवा तामिळनाडूला जा, मग मारून दाखवा, जर तेथील लोकांनी तुम्हाला आपटू आपटू नाही मारले तर पाहा.

'तुम्ही कोणता कर आणता'
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना निशिकांत दुबे यांनी हे विधान केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, तुम्ही असे काय म्हणत आहात की आम्हाला मराठी बोलायचे आहे. तुम्ही कोणाची भाकरी खात आहात? टाटा, बिर्ला, रिलायन्स आहे. महाराष्ट्रात एकही युनिट नाही. जर बिहार त्यावेळी नसता तर टाटांनी तिथे पहिला कारखाना बांधला असता. तुम्ही आमच्या पैशावर जगत आहात, तुम्ही कोणता कर आणता, तुमच्याकडे कोणता उद्योग आहे? आमच्या झारखंडमध्ये व छत्तीसगडमध्ये खाणी आहे, मध्य प्रदेशात आहे, ओडिशामध्ये आहे, तुमच्याकडे कोणत्या खाणी आहेत?"
#WATCH | Guwahati, Assam | On Raj Thackeray's remark 'beat but don't make a video', BJP MP Nishikant Dubey says, "...You people are surviving on our money. What kind of industries do you have?... If you are courageous enough and beat those who speak Hindi, then you should beat… pic.twitter.com/gRvAjtD0iW
— ANI (@ANI) July 7, 2025
'तुम्ही असे घाणेरडे राजकारण का करत आहात?
भाजप खासदार निशीकांत दुबे म्हणाले की, "जर रिलायन्स किंवा एसआरने रिफायनरी उभारली असेल तर ती गुजरातमध्ये आहे. संपूर्ण सेमीकंडक्टर उद्योग गुजरातमध्ये येत आहे. तुम्ही गुंडगिरी खेळत आहात का? त्याशिवाय, तुम्ही आमचे शोषण करून कर भरता. जर तुमच्यात जास्त हिंमत असेल तर जर तुम्ही हिंदी भाषिकांना मारहाण केली तर उर्दू भाषिकांनाही मारहाण करा. तमिळांनाही मारहाण करा. तेलुगू भाषिकांनाही मारहाण करा. तुम्ही असे घाणेरडे कृत्य का करत आहात'
'बिहार, उत्तर प्रदेशात या, तुम्हाला आपटू आपटू मारतील'
निशिकांत दुबे पुढे म्हणाले, "मी नेहमीच म्हटले आहे की, जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरात, महाराष्ट्रात असाल, जर तुम्ही मोठे बॉस असाल, तर बिहारमध्ये या, उत्तर प्रदेशात या. तामिळनाडूमध्ये या. आम्ही तुम्हाला मारहाण करू. ही अराजकता चालणार नाही." येथे आल्यावरही लोक तुम्हाला बेदम मारतील.
'माहीम दर्ग्यासमोर हिंदी-उर्दू भाषिकांना मारहाण करून दाखवा'
भाजप खासदार असेही म्हणाले की, "बीएमसी निवडणुका होणार आहेत, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जे काही करत आहेत, त्यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही. आम्ही याचा विरोध करू. जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी जवळच्या माहीम परिसरात जाऊन माहीम दर्ग्यासमोर हिंदी भाषिक किंवा उर्दू भाषिक व्यक्तीला मारहाण करण्याचा प्रयत्न करावा, तर मी मान्य करेन की, ते खरोखर बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार आहेत. ते खरचं बाळासाहेब ठाकरेंच्या तत्वांचे पालन करतात.
आम्ही मराठीचा आदर करतो - निशिकांत दुबे
यासोबतच निशिकांत दुबे म्हणाले की, "आम्ही मराठीचा आदर करतो. मराठी ही एक आदरणीय भाषा आहे. आम्ही छत्रपती शाहू जी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे, तात्या टोपे, सर्वांचा आदर करतो. टिळक असोत किंवा लजपत राय, गोपाळ कृष्ण गोखले असोत, सर्वांनी स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिले आहे. आम्ही सर्व मराठी स्वातंत्र्यसैनिकांचा आदर करतो. भारताच्या स्वातंत्र्यात महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे."












Click it and Unblock the Notifications