Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी : भाजप विधिमंडळाची बुधवारी बैठक, सीतारामन अन् विजय रुपाणी असतील पक्षनिरीक्षक

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून जवळपास 10 दिवस लोटले तरी महायुतीला अद्याप आपला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवता आला नाही. महायुतीत भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने 1 मुख्यमंत्री व 2 उपमुख्यमंत्र्यांचा फॉर्म्युला तयार केलेला आहे. अशातच भाजप विधिमंडळाची बुधवारी बैठक होणार असून या बैठकीसाठी पक्षनिरीक्षक म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मंत्री विजय रुपाणी हे असणार आहेत.

4 डिसेंबर रोजी भाजपची बैठक?

भाजपने आपल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानुसार विजय रुपाणी मंगळवारी सायंकाळी, तर निर्मला सीतारामन 4 डिसेंबर रोजी सकाळी मुंबईत पोहोचतील.

4 डिसेंबर रोजी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. त्यात नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची निवड केली जाईल. त्यानंतर 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वा. मुंबईच्या आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

Maharashtra Assembly Election 2024

देवेंद्र फडणवीसांचे नाव निश्चित?

भाजपने मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित केले आहे. पण ऐनवेळी भाजप धक्कातंत्र राबवण्याचीही शक्यता आहे. अजित पवार व देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत अमित शहा यांची भेट घेणार होते. पण फडणवीस यांनी अचानक आपला दौरा रद्द केला आहे. त्यामुळे अजित पवार एकटेच दिल्लीला रवाना झाला आहेत. यापूर्वी 28 नोव्हेंबर रोजी एकनाथ शिंदे, फडणवीस आणि पवार हे तिघेही दिल्लीला गेले होते, त्या बैठकीत काही निर्णय झाले.

महायुतीला निवडणुकीत प्रचंड यश!

विधानसभा निवडणुकीत महायुतीला 230 जागा मिळाल्यात. 145 हा बहुमताचा जादुई आकडा आहे. या आकड्याहून 85 जास्त जागा महायुतीला मिळाल्या आहेत. महायुतीला भाजपला 132, शिवसेनेला 57 व अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्यात.

5 डिसेंबरला आझाद मैदानावर शपथविधी

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात सांगितले होते की, नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. पंतप्रधान मोदी स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

तीन वेळा बैठक लावण्याची वेळ

या घडामोडींत भाजपवर तिसऱ्यांदा आपल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीची तारीख बदलण्याची वेळ आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आता ही 4 डिसेंबरला बैठक होईल. यापूर्वी ही बैठक 29 नोव्हेंबर रोजी होणार होती. पण ती ऐनवेळी 1 डिसेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली. त्यानंतर ती 3 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण आता ती 4 तारखेला होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, भाजपने मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित केले आहे. आता केवळ औपचारिक घोषणा बाकी असल्याचे बोलले जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+