भाजप नेत्या पंकजा मुंडेंचं खास रक्षाबंधन, धनुभाऊ आणि महादेव जानकर यांनी बांधली राखी
Raksha Bandhan 2024 : देशभरात आज रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. रक्षाबंधन हा सण भाऊ आणि बहिणीच्या नात्याचे प्रतीक आहे. रक्षाबंधनाच्या सणाला बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्य आणि आनंदासाठी शुभेच्छा देते. भाऊ आपल्या प्रिय बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो.
आज सर्वसामान्य रक्षाबंधनापेक्षा राजकीय नेत्यांच्या रक्षाबंधनाकडे सर्वांचं लक्ष असतं. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी रक्षाबंधनानिमित्त आपला भाऊ आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि रासपचे नेते महादेव जानकर यांना राखी बांधली. कृषीमंत्री मुंडे यांनी रक्षा बंधनाचा व्हिडीओ आपल्या सोशल मिडीयावर शेअर केला आहे.

मागील काही वर्षांपूर्वी मुंडे कुटुंबियांमध्ये राजकीय वातावरणामुळे बहिण-भावांमधील संबंध ताणले गेले होते. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीत आल्याने हे संबंध पूर्ववत होताना दिसत आहेत. यंदा रक्षाबंधनानिमित्त भाजप नेत्या पंकजा मुंडे , माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे आणि यशश्री मुंडे यांनी भाऊ धनंजय मुंडे यांना राखी बांधली.
आज मुंबईत माझ्या भगिनी आ.पंकजाताई, डॉ.प्रीतमताई, ऍड.येशूताई यांनी राखी बांधत रक्षाबंधन साजरे केले. तिघींनाही रक्षाबंधनच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या...@Pankajamunde @DrPritamMunde pic.twitter.com/UbT3nZCM6I
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) August 19, 2024












Click it and Unblock the Notifications